छतावरील सोलर च्या अनुदानासाठी नवी अर्ज प्रक्रिया | New to simplified procedure install rooftop solar plant

ऊर्जा मंत्रालयाने निवासी ग्राहकांसाठी छतावर सौर ऊर्जा निर्मिती संयंत्र स्थापित करण्यासाठी सोपी प्रक्रिया केली जारी 

New to simplified procedure install rooftop solar plant

संकेतस्थळे /सोशल मीडियावर प्रकाशित होत असलेल्या दिशाभूल करणाऱ्या फसव्या माहितीपासून दूर राहण्याचा  सामान्य जनतेला सल्ला

Ministry of New and Renewable Energy issues simplified procedure   to  install rooftop solar plant for the residential consumers


नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालया मार्फत  निवासी ग्राहकांसाठी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती सयंत्र ( rooftop solar plant ) लावण्यासाठी अनुदान दिले जाते. 

या योजने अंतर्गत लाभार्थी स्वतःहून  किंवा त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही विक्रेत्याद्वारे छतावर  सौर ऊर्जा निर्मिती  संयंत्र स्थापित करू शकतो. 


आणि याच योजनेसाठी ची  सोपी  प्रक्रिया ऊर्जा मंत्रालयाने  जारी केली आहे.नवीन प्रक्रियेतील काही मार्गदर्शक सूचना  खालील प्रमाणे आहेत:


  • लाभार्थ्यांकडून अर्जांची नोंदणीत्यांची मान्यता आणि प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी ऊर्जा मंत्रालय मार्फत एक राष्ट्रीय पोर्टल विकसित केले जाईल. याचबरोबर डिस्कॉमच्या स्तरावर तशाच  स्वरूपात एक पोर्टल असेल आणि दोन्ही पोर्टल एकमेकांशी जोडली जातील. 

  • नवीन प्रणाली अंतर्गत छतावर सौर ऊर्जा निर्मिती संयंत्र (rooftop solar plant RTS) स्थापित करू इच्छिणाऱ्या स्थानिक लाभार्थीना या योजनेचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज करावा लागेल. 

  • या अर्जात लाभार्थ्याने ज्यात अनुदानाची रक्कम हस्तांतरित केली जाईल अशा बँक खात्याच्या तपशीलांसह आवश्यक माहिती सादर करणे आवश्यक आहे. 

  • अर्ज करताना लाभार्थ्याला संपूर्ण प्रक्रिया आणि छतावर सौर ऊर्जा निर्मिती संयंत्र  स्थापनेसाठी मिळू शकणार्‍या अनुदानाच्या रकमेबद्दल माहिती दिली जाईल.

  • अर्ज केल्यानंतर पुढील 15 कामकाजाच्या दिवसांत तांत्रिक व्यवहार्यता मंजूरीसाठी अर्ज संबंधित डिस्कॉमकडे ऑनलाइन पाठविला जाईल. 
  • अर्ज डिस्कॉम कडे  हस्तांतरित केल्यानंतर तो डिस्कॉम (DISCOM ) पोर्टलवर देखील प्रदर्शित केला जाईल.

  • तांत्रिक व्यवहार्यता प्राप्त केल्यानंतरलाभार्थी डीसीआरच्या अटींची पूर्तता करणारे J3IS द्वारे प्रमाणित ALMM आणि इन्व्हर्टर अंतर्गत नोंदणी असलेले सोलर मॉड्यूल्स निवडून त्याच्या पसंतीच्या कोणत्याही विक्रेत्याकडून सौर ऊर्जा निर्मिती संयंत्र  स्थापित करेल. या योजनेअंतर्गत  निवड करण्यात आलेल्या पात्र  विक्रेत्यांची यादी पोर्टलवर उपलब्ध केली जाईल.

हे नवीन लाँच करण्यात आले आहे 

https://solarrooftop.gov.in/


राष्ट्रीय पोर्टल कार्यान्वित होईपर्यंतछतावरील सौर ऊर्जा संयंत्रांच्या ( rooftop solar plant ) स्थापनेसाठी डिस्कॉमकडून  अनुदान मिळविण्याची विद्यमान प्रक्रिया सुरू राहील आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून  अनुदान मिळविण्यासाठी ही एकमेव अधिकृत प्रक्रिया असेल.संकेतस्थळे /सोशल मीडियावर विशेषत: छतावरील सौरऊर्जा संयंत्रांच्या ( rooftop solar plant ) स्थापनेसाठी केंद्र  सरकारचे अनुदान मिळविण्यासाठी नोंदणी शुल्क किंवा इतर रक्कम  आकारणी बाबत कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या/फसव्या माहितीवर विश्वास ठेवू नयेअसा सल्ला सर्वसामान्यांना देण्यात येत आहे. यासंदर्भातील विश्वासार्ह माहिती मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर  www.mnre.gov.in  किंवा SPIN पोर्टल www.solarrooftop.gov.in वर उपलब्ध केली जाईल.