कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ₹५०० क्विंटल कांदा अनुदानाची मागणी || Kanda Anudan 2026

गडगडलेल्या भावामुळे नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ₹५०० प्रति क्विंटल अनुदानाची मागणी 

Kanda Anudan 2026

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या गडगडलेल्या भावामुळे अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करत आहे.

एकंदरीत राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी प्रति क्विंटल सुमारे ₹१,५०० रुपये इतका उत्पादन खर्च येतो मात्र बाजारभाव मात्र ₹५०० च्या आसपास आहेत.



राज्यात गेल्या काही दिवसापासून सुमारे १,००० रुपयांवर स्थिर असलेले दर अचानक कोसळल्यामुळे याचबरोबर राज्यात ठिकठिकाणी झालेल्या बेमोसमी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

एकंदरीत उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी कर्जबाजारी देखील झाला असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.

यापूर्वी राज्य शासनाने  २०२३ मध्ये कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान दिले होते; मात्र सध्याची परिस्थिती त्यापेक्षाही अधिक खराब आहे. 

त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळावा यासाठी किमान प्रति क्विंटल ५०० रुपये अनुदान जाहीर करावे, अशी मागणी श्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केवळ अनुदान देऊन हा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार नाही. इतर पिकांप्रमाणे कांद्यालाही उत्पादन खर्चावर आधारित निश्चित आधारभूत किंमत मिळणे अत्यावश्यक आहे. 

यासाठी किमान २,२५० रुपये प्रति क्विंटल हमीभाव निश्चित करून त्यासंदर्भात दीर्घकालीन व शाश्वत धोरण ठरवावे अशी मागणी देखील त्यांच्यामाध्यमातून करण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून अचानकपणे लादल्या जाणाऱ्या निर्यातबंदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याची विश्वासार्हता कमी होत आहे. परिणामी, परदेशी आयातदार इतर देशांकडे वळत असून भारतीय शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि भारतीय कांद्याला जागतिक बाजारपेठेत स्थैर्य मिळवून देण्यासाठी कांदा निर्यातीबाबत ठोस, सातत्यपूर्ण आणि पारदर्शक धोरण आखण्याबाबत केंद्र सरकारकडे राज्यशासनाने आग्रहपूर्वक पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात हे देखील पाहण्यासारखे असणार आहे, साहजिकच सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आता शासनाच्या भूमिके कडे लक्ष लागले आहे.


#OnionFarmers
#SupportFarmers
#MSPForOnion
#FarmersFirst

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map