खरीप 2025 चा पीकविमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
pikvima 2025
खरीप २०२५ हंगामातील प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा बैठक आज राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
राज्यात भारतीय कृषी विमा कंपनी आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीमार्फत योजना राबविण्यात येत असून, सोयाबीन, भात, उडीद, मूग, बाजरी आदी पिकांच्या पिक कापणी प्रयोगांची आकडेवारी व तांत्रिक उत्पादन केंद्र शासनाच्या विमा पोर्टलवर नोंदविण्यात आलेली आहे.
विमा कंपन्यांनी या माहितीवर तात्काळ कार्यवाही करून नुकसान भरपाई निश्चित करावी आणि ती विलंब न करता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, असे स्पष्ट निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले.
याबाबत केंद्र शासनाकडे आवश्यक पाठपुरावा करण्यासह, शेतकऱ्यांना वेळेत न्याय मिळावा, यासाठी शासन कटिबद्ध आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.