Divyang ToolKit Scheme दिव्यांग लाभार्थ्यांना ₹१५००० अनुदान; कोण पात्र, कागदपत्र, अटी काय पहा

दिव्यांग लाभार्थ्यांना ₹१५००० अनुदान; दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ToolKit योजना.

Divyang TooKit Scheme 

राज्यातील दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जात आहेत.

या लाभाच्या योजना, शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन, इ. क्षेत्रात विविध योजना राबविल्या असल्या तरी, दिव्यांग व्यक्तींना रोजगार/स्वयंरोजगार क्षेत्रात कमी संधी उपलब्ध आहेत.



दिव्यांग व्यक्तींमध्ये रोजगाराभिमुख शिक्षणाची कमतरता, शारिरीक व मानसिक मर्यादा तसेच आर्थिक पाठबळाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे दिव्यांग व्यक्तींना रोजगार मिळत नाही.

यामुळे ITI, MSCEVT, PMKVY, NSDC, NULM किंवा तत्सम संस्थांकडून कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्या  "दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री (Toolkit) घेण्यासाठी वित्तीय सहाय्य" या नवीन योजनेस शासनाने मंजुरी दिली आहे.

या योजनेतून ITI, MSCEVT, PMKVY, NSDC, NULM किंवा तत्सम संस्थांकडून कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री (Toolkit) घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य मिळणार आहे.


प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री घेण्याकरिता रुपये १५,०००/- इतके अर्थसहाय्य देण्यात येईल.

अटी शर्ती पात्रता 

  1. ही योजना दिव्यांगत्वाच्या सर्व प्रवर्गासाठी लागू राहील.
  1. अर्जदाराचे/लाभार्थ्याचे वय १८ वर्षापेक्षा कमी नसावे.
  1. सदर योजनेंतर्गत अर्थसहाय्याची कमाल मर्यादा रुपये १५,०००/- इतकी राहील.
  1. शासकीय प्रशिक्षण संस्था/शासनमान्य प्रशिक्षण संस्था अथवा दिव्यांग कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलेला दिव्यांग प्रशिक्षणार्थी या योजनेस पात्र असेल.
  1. प्रशिक्षित दिव्यांग महिलांना प्राधान्य दिले जाईल.
  1. लाभार्थ्यांस मंजूर केलेले आर्थिक सहाय्य त्याने प्रशिक्षण घेतलेल्या व्यवसायासाठी


लाभासाठी लागणारी कागदपत्र 

  • विहीत नमुन्यातील अर्ज.
  • आधारसंलग्न वैध वैश्विक ओळखपत्र (UDID) दिव्यांगत्व प्रमाणपत्र.
  • प्रशिक्षण प्रमाणपत्र.
  • अधिवास प्रमाणपत्र.
  • साधनसामग्री (Toolkit) / आवश्यक साहित्याची यादी.
  • आधारसंलग्न बँक खात्याचा तपशील.


योजनेसाठी लाभार्थ्याने सादर करावयाच्या अर्जाचा नमुना Link 🔗 👇🏻👇🏻

लाभार्थ्यांने जिल्हा कार्यालयाकडे अर्ज सादर करावयाचा आहे. केलेल्या अर्जाची छाननी करुन अर्थसहाय्यासाठी पात्र लाभार्थ्यांचे निवड समितीच्या माध्यमातून केली जाईल

"दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री (Toolkit) घेण्यासाठी वित्तीय सहाय्य" या योजनेचे लाभार्थी निवड मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीकडून केली जाईल.

समितीने मान्य केलेल्या पात्र लोकांची यादी मान्यतेसाठी आणि निधीच्या मागणीसाठी आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे यांचेकडे सादर करतील.

आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे यांच्याकडून जिल्हानिहाय पात्र लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बैंक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) निधी जमा करण्यात येईल.

निधी वितरित केल्यानंतर १ महिन्यांनी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी लाभार्थ्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी भेट देऊन लाभार्थ्यांने व्यवसाय सुरु केल्याची खातरजमा करतील.

सुरवातीच्या १ वर्षाच्या काळात लाभार्थ्याचा व्यवसाय सुरळीतपणे चालू होईल यासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाकडून सर्वोतोपरी सहाय्य केले जाईल.

लाभार्थ्याने व्यवसाय सुरु करुन दर ३ महिन्याला अहवाल जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयास सादर करावा.

जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाने वर्षातून दोन वेळेस (सहामाही) लाभार्थ्याचा व्यवसाय सुरु असल्याची पाहणी करावी.

योजनेच्या निवड समितीने वर्षातून एकदा लाभार्थ्यांच्या व्यवसायाची पाहणी करावी/आढावा घ्यावा. चालू वर्षातील लाभार्थ्यांच्या व्यवसायाची माहिती पुढील वर्षाच्या निवड समितीच्या बैठकीत सदस्य सचिवांनी सादर करावी.

लाभार्थ्याने ज्या प्रयोजनासाठी आर्थिक सहाय्य घेतले आहे, तो व्यवसाय सुरु न केल्यास मंजूर आर्थिक सहाय्याची वसूली करण्यात यावी. अशा सूचना या शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत 


👇🏻👇🏻

ARJ NAMUNA PDF


शासन निर्णय येथे पहा 




या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map