ही राशन कार्ड होणार बंद; करा तात्काळ हे काम Ration card update

ही राशन कार्ड होणार बंद; करा तात्काळ हे काम 

Ration card update


धान्याची उचल  न करणाऱ्या  शिधापत्रिका होणारं रद्द 


राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून धान्याचा लाभ देण्यात येतो. लाभार्थ्यांना धान्य वितरित करण्यासाठी ई-पॉस मशीनवर लाभार्थ्यांचे आधार अधिप्रमाणित करुन धान्य वितरित करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यासाठी शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार सीडींग पूर्ण होणे आवश्यक आहे. 

ज्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे आधार सीडींग करून घेतलेली नाही. अशा सदस्यांची नावे ऑनलाईन आरसीएमएस प्रणालीतून वगळण्यात येणार आहे. तसेच ज्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांना अनुज्ञेय असलेले धान्य मागील अनेक वर्षापासून उचल केली नाही किंवा आधार कार्ड संबंधित नोंदी अद्ययावत केलेल्या नाहीत अशा  शिधापत्रिकेचा आरसीएमएस प्रणालीतून वगळण्यात आल्या आहेत.

केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून १ एप्रिल २०२६ पासून रेशन कार्डच्या नियमांत मोठे बदल केले जाणार आहेत. योजनेच्या निकषात न बसणाऱ्या अनेक अपात्र लाभार्थ्यांचे नाव राशन योजनेमधून कमी केली जाणार आहेत.

केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून खऱ्या गोर गरिबांना लाभ मिळवून देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.  राशन योजने अंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्याकडे अटीपेक्षा जास्त संपत्ती किंवा उत्पन्न आहे असे लाभार्थी या योजनेतून वगळले जाणार आहेत.

लाभार्थ्याचे शहरी भागात वार्षिक उत्पन्न ३ लाख तर ग्रामीण भागासाठी २ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास या लाभार्थ्यांना लाभ मिळणार नाही. ज्या लाभार्थ्याकडे चारचाकी वाहन, १०० चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा प्लॉट, फ्लॅट किंवा स्वतःचे पक्के घर आहे असे लाभार्थी अपात्र ठरतील.

याचबरोबर आयकर भरणारे, शहरात ८० चौरस मीटरपेक्षा जास्त साईजचा गाळा, घरात वातानुकूलित यंत्र, ५ kw क्षमतेचे DG असणारे लाभार्थी अपात्र असतील. योजनेअंतर्गत लाभार्थी आर्थिक स्थिती लपवून रेशनचा लाभ घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. अशा लोकांसाठी सरकारने कडक इशारा दिला आहे.

जर एखाद्या लाभार्थ्याने खोटी माहिती देऊन रेशन कार्ड काढले असेल तर ते स्वतः सरेंडर करावे जर कोणी अशाप्रकारे दोषी आढळले, तर केवळ रेशन कार्ड रद्दच नाही तर घेतलेल्या लाभाची बाजारभावाने वसुली केली जाणार आहे.

बोगस लाभार्थीवर कायदेशीर गुन्हाही दाखल केला जाऊ शकतो.  याचबरोबर रेशन कार्ड 'ई-केवायसी' करणे हे अनिवार्य असून, ज्यांची केवायसी झालेली नाही त्या लाभार्थ्यांचे राशन वाटप तात्पुरते बंद करण्यात येते.


त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी त्यांना अनुज्ञेय असलेले धान्य दरमहा उचल करावी. तसेच शिधापत्रिका मधील व्यक्तींचे आधार सीडींगचे काम पूर्ण करून घ्यावे. यापुढे शिधापत्रिकाधारकांनी आधार सीडिंग करून घेतली नाही अथवा सहा महिन्यापर्यंत धान्य उचल केले नाही. 

अशा शिधापत्रिकाधारकांची नावे वगळण्यात येणार आहेत. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map