हरभरा हमीभाव खरेदीला मंजुरी; अशी करा नोंदणी || Harbhara Hamibhav Kharedi 2026

हरभरा हमीभाव खरेदीला मंजुरी; अशी करा नोंदणी

Harbhara Hamibhav Kharedi 2026 

राज्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी!; केंद्र शासनाची हमीभावाने हरभरा खरेदीला मंजुरी.

राज्यात ७ लाख ६१ हजार मेट्रिक टन हरभरा हमीभाव योजनेअंतर्गत खरेदी केला जाणार.

केंद्र सरकार रब्बी हंगाम- 26 मध्‍ये ‘प्रधानमंत्री अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान’ (पीएम - आशा) अंतर्गत हरभरा, मोहरी आणि मसूर यांच्या मोठ्या प्रमाणात खरेदीद्वारे शेतकऱ्यांना भरभक्कम आधार किंमत देत आहेकेंद्र

शासनाच्या आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत १ मार्च २०२६ पासून हरभरा खरेदीच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. राज्यात १ मार्च २०२६ ते 15 APRIL २०२६ या कालावधीत हरभरा हमीभाव खरेदी साठी ऑनलाइन नोंदणी केली जाणार आहे.


राज्यात हरभरा बाजारातील चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर हमीभावाने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या बाजारात शेतकऱ्यांना ४८०० ते ५३०० असा अतिशय अल्प भाव मिळत आहे.


हरभरा हमीभाव खरेदी नोंदणी २०२६ अंतर्गत शेतकऱ्यांना नोंदणीसाठी आधारकार्ड, ई पीक पाहणी सातबारा उतारा, आधार लिंक असलेले बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांक आवश्यक असणार आहे. 

हमीभाव खरेदी नोंदणी ( chana hami bhav 2026 maharashtra)  प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक ठेवण्यात आली असून ऑनलाइन पोर्टलद्वारे तसेच 'eSamriddhi' मोबाईल अॅपच्या माध्यमातूनही घरबसल्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.


याचबरोबर शेतकरी सध्या सुरु असलेल्या तूर हमीभाव खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष भेटून ही नोंदणी करू शकतात.

रब्बी हंगाम 2026 साठी, मूल्य समर्थन योजनेअंतर्गत, महाराष्ट्रात 7,61,250 मेट्रिक टन (एमटी), तर गुजरातमध्ये 4,13,250 मेट्रिक टन, मध्य प्रदेशात 5,80,000 मेट्रिक टन आणि राजस्थानमध्ये 5,53,000 मेट्रिक टन हरभरा खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

रब्बी हंगाम 2026साठी मूल्य समर्थन योजनेअंतर्गत, राजस्थानमध्ये 13,78,750 मेट्रिक टन तर गुजरातमध्ये 1,33,000 मेट्रिक टन मोहरी खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. रब्बी हंगाम 2026 साठी मध्य प्रदेशात 6,01,000 मेट्रिक टन मसूर खरेदी करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता दिली आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map