रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदान लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन | Mgnrega scheme 2022

रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदान लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Mgnrega scheme 2022

MGNREGA scheme 2022


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2022-23 अंतर्गत कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या फळबाग / फुलपिके लागवड, व्हर्मी कंपोष्ट, नाडेप कंपोष्ट व शेततळे या घटकांसाठी अनुदानाचा लाभ होण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

मागेल त्याला काम देणे व गावामध्ये आर्थिक समृध्दी आणणे हे मनरेगा योजनेचे उद्दिष्ट्य असून यासाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार जॉबकार्ड धारक असावा. अर्जदार अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, भटक्या जमाती, निरधिसुचित जमाती ( विमुक्त जमाती ), दारिद्रय रेषेखालील इतर कुटुंबे, स्त्री कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना, अनुसुचित जमातीचे व इतर पारंपारिक वनवासी या सर्वांना प्राधान्यक्रम दिल्यानंतर कृषि कर्ज माफी योजना, अल्प भूधारक व सीमांत भूधारक यांना प्राधान्य देण्यात यावे. अर्जदाराची जमिन (0.05 हेक्टर ते जास्तीत-जास्त 2 हेक्टर पर्यंत ) असणे आवश्यक.

आवश्यक कागदपत्र 

 7/12 व 8 अ,  आधारकार्ड, बँक पासबुक व जॉब कार्ड ही कागदपत्रे आवश्यक असून अर्ज गावातील ग्रामपंचायतीमध्ये करावे. 

मनरेगा अंतर्गत व्हर्मी कंपोष्ट, नाडेप कंपोष्ट, शेततळे व फळबाग/ फुलपिके ही  कामे मंजुर आहेत.

अनुदान - व्हर्मी कंपोष्ट- रक्कम रुपये 11 हजार 944 प्रति युनिट, नाडेप कंपोष्ट -  रक्कम रुपये 10 हजार 537 प्रति युनिट,

शेततळे -आकारमानानुसार रक्कम रुपये 60 हजार ते रक्कम रुपये 3 लाख पर्यंत 

फळबाग/ फुलपिके - जास्तीत जास्त रक्कम रुपये 2 लाख प्रति हेक्टर याप्रमाणे.

योजनेत अंतर्भुत फळपिके / वृक्ष - आंबा, काजू, चिकू, पेरु, डाळींब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, चिंच, सिताफळ, आवळा, नारळ, बोर, कवठ, जांभुळ, कोकम, फणस, अंजीर, साग, सुपारी, कडीपत्ता, कडूलींब, शेवगा, केळी, ड्रॅगनफ्रुट, करवंद, तुती, जड्रोफा, गिरीपुष्प, पानपिंपरी, द्राक्ष, चंदन, खाया, निम, चारोली, महोगनी, बाभुळ, अंजन, खैर, ताड, सुरु, रबर, महारुख, मँजियम, ऐन, शिसव, निलगिरी, गुलमोहर, महुआ, चिनार, शिरीष, बांबू व औषधी वनस्पती इत्यादी.

फुलपिके - गुलाब, मोगरा, निशीगंध व सोनचाफा


अनुदानातील अंतर्भुत बाबी -जमीन तयार करणे, खड्डे तयार करणे, कांड्या / कलमांची बीले व नांगी भरणे, खते देणे, आंतरमशागत, पीक संरक्षण व पाणी देणे इ.

अनुदान लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यावर जमा करण्यात येते. अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.