CCI Cotton msp राज्यात CCI कापूस हमीभाव खरेदीला मुदतवाढ, तूर हरभरा मका खरेदी सुरू

राज्यात CCI कापूस हमीभाव खरेदीला मुदतवाढ, तूर हरभरा मका खरेदी सुरू.

CCI Cotton msp procurement Maharashtra 

अखेर मोठ्या मागणीनंतर CCI कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात कापूस हरभरा तूर आणि मका या हमीभाव खरेदी सुरू आहे.

CCI कापूस हमीभाव खरेदी साठी २७ फेब्रुवारीची मुदत संपल्यामुळे केंद्र बंद करण्यात आलेली होती मात्र मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा कापूस बाकी असल्याने व बाजारात दर कमी असल्याने CCI कापूस खरेदी करावा अशी मोठी मागणी होती. याच पार्श्वभूमीवर आता कापसाच्या हमीभावाने खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

राज्यात मका खरेदीला देखील 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे, मका हमीभाव खरेदी साठी राज्याला 66 हजार मेट्रिक टन अतिरिक्त लक्षांक देण्यात आलेला आहे. याचबरोबर हरभऱ्याची १ मार्च ते 31 मार्च पर्यंत हमीभावानं खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे.

राज्यात सहा लाख 71 हजार मेट्रिक टन एवढा हरभरा हमीभावानं ( Chana MSP Procurement ) खरेदी केला जाणार आहे.


तूर हमीभाव खरेदी ( Tur Nafed Procurement ) मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आलेली आहे, तुरीची शेतकऱ्यांना 23 मार्च 2026 पर्यंत हमीभावाने विक्री करता येणार आहे.

कापसाच्या हमीभावाने खरेदीसाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून यांना एक पत्र लिहून एप्रिल पर्यंत ही मुदत वाढवण्याची मागणी केलेली होती, मात्र आता एप्रिल पर्यंत नाही तर पंधरा मार्चपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

CCI कापूस हमीभाव खरेदीला १५ मार्चपर्यंत मिळवलेली मुदतवाढ सुद्धा कमी आहे याच्यामध्ये सुद्धा आणखीन मुदतवाड मिळण्याची मागणी होईल. साहजिकच यांच्यामध्ये काही मुदत वाढ ही मिळू शकते.



या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map