आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई; करा आजच हे काम
Mango Subsidy 2026
खरीप 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच सर्व स्तरांवरती नुकसान झालेलं होतं, पिकांचे नुकसान झाले होते, फळबागांचा नुकसान झालं होतं. असंच एक मोठ नुकसान झाले ते म्हणजे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे कारण या झालेल्या अतिवृष्टीमुळे किंवा नैसर्गिक प्रतिकूल परिस्थिती मुळे मोठ्या प्रमाणात मोहर गळला किंवा आंब्याला लागलेल्या छोट्या छोट्या कैऱ्या गळून पडल्या.
यामुळे मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन घटलेले आहे.या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये राज्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनुदानाची मागणी केली जात आहे.
ही मागणी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे या संदर्भातील मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची बैठक पार पडलेली आहे.या बैठकीमध्ये हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वीच जे काही नुकसानग्रस्त आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी असतील यांना झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर दिलासा देण्यासाठी मदतीचे पॅकेज जाहीर केले जाईल, पलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे नुकसानीची तीव्रता लक्षात येत आहे. अशा प्रकारच्या नुकसानीच्या परिस्थितीत यापूर्वी कशाप्रकारे मदत केली आहे, या संदर्भातील सर्व बाबींचा सांगोपाग विचार करून मदत देण्यात येईल. याबाबत दोन्ही उपमुख्यमंत्री, फलोत्पादन व कृषी मंत्री तसेच कोकणातील लोकप्रतिनिधींचे मत विचारात घेण्यात येईल. अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दिलेली आहे.
नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना मदत करण्याची शासनाची भूमिका असून अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात ही मदत जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंबा व काजू प्रश्नाबाबत विधानभवनात आयोजित बैठकीत सांगितले.
विशेषता कोकणातील काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही घोषणा केली जाणार असल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. मात्र राज्यातील सर्वच भागातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा नुकसान झालेले आहे याच पार्श्वभूमीवर आंबा फळबागा धारक शेतकऱ्यांच्या माध्यमातून या आंबा या पिकाच्या झालेल्या नुकसानीसाठी नुकसानीची भरपाईची मागणी केली जात आहे.
जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून काही जिल्ह्यामध्ये पत्रक काढून आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तुम्ही जर आंबा उत्पादन शेतकरी असाल आणि तुमच्याकडे जर अशाच प्रकारे फळगळ झाली असेल मोहोर गळला असेल किंवा उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता दिसून येत असेल, नुकसान झालेलं असेल तर आपल्या कृषी सहायक असे संपर्क करा. आपला पंचनामा करून घ्या जेणेकरून असं जर काही नुकसान भरपाईच पॅकेज जाहीर करण्यात आलं तर आपल्याला देखील त्याच्या माध्यमातून मदत मिळू शकते.