पुढील ३ दिवस जोरदार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना अलर्ट | Monsoon Forecast 2026
पुढील ३ दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना अलर्ट
Monsoon Forecast 2026

गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यात 2८ जुलै पर्यंत राज्यात पावसाला पोषक वातावरण राहील असा अंदाज वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये उडीसा जवळ एक कमी दाबाचा क्षेत्र निर्माण होऊन ते अधिक तीव्र होऊन पश्चिम दिशेला सरकत आहे आणि याचा एक मोठा फायदा राज्यातील पावसाला होणार आहे.
याच पार्श्वभूमी वरती राज्यात 28 जुलै 2026 रोजी चंद्रपूर गडचिरोली रायगड जळगाव पुण्याचा घाटमात्याचा परिसर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरचा घाटमात्याचा परिसर छत्रपती संभाजी नगर जालना परभणी, हिंगोली, नांदेड अमरावती यवतमाळ वर्धा, नागपूर भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
तर 29 जुलै रोजी गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून नाशिक घाट परिसर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला, वाशिम अमरावती यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा कोल्हापूर घाटमात्याचा परिसर साताऱ्याचा घाटमात्याचा परिसर रत्नागिरी रायगड पुणे घाटमात्याचा परिसर सिंधुदुर्ग या भागामध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
तर ३० जुलै 2026 रोजी रायगड पुणे सातारा नाशिकचा घाटमात्याचा परिसर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरचा घाटमात्याचा परिसर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा एलोवेलट देण्यात आलेला आहे.
या काळामध्ये वादळी वारा सुद्धा राहू शकतो याच्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असा आव्हान देखील करण्यात आलेला आहे.