शासनाची मोठी खुशखबर! अंशकालीन स्त्री परिचर मानधन दुप्पट
ASP Mandhan GR
राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य उपकेंद्रामध्ये कार्यरत असलेल्या अंशकाली स्त्री परिचरासाठी अतिशय दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे.
राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य उपकेंद्रामध्ये कार्यरत असलेल्या अंशकालीन स्त्री परिचर यांच्या मासिक मानधनांमध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा जीआर 17 मार्च 2026 रोजी घेण्यात आलेला आहे.
GR PDF Link
आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचरांच्या मानधनात दुप्पट वाढ
अंशकालीन स्त्री परिचर यांच्या मासिक मानधनांमध्ये 1 एप्रिल 2026 पासून दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
सार्वजनिक आरोग्य केंद्रामधील अंशकालीन स्त्री परिचर गाव पातळीवरती, आदिवासी दुर्गम भागातील डोंगराळ भागांमधील प्राथमिक स्वरूपाच्या आरोग्यसेवा या तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा रोल पार पाडतात.
राज्यात आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य विषयक कार्यक्रमाचा लाभ प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी या स्त्री परिचारंची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आरोग्य विभागातील त्यांचे हे काम पाहून आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून केलेले मागणी, विविध संघटनाच्या माध्यमातून केलेले मागणी, याचप्रमाणे इतरही काही मागण्याच्या अनुषंगाने हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातील अंशकालीन स्त्री परिचर यांना 2019 च्या शासन निर्णयानुसार तीन हजार रुपये मानधन देण्यात येते. अंशकालीन स्त्री परिचर यांच्या कामाचं बदलत स्वरूप, आरोग्य सेवेतील महत्व, वाढती महागाईचा विचार या सर्व बाबींचा विचार करता मासिक मानधनांमध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .
करण्यात आलेली वाढ ही एक एप्रिल 2026 पासून लागू राहणार आहे. यापूर्वी दिले जाणारे तीन हजार रुपये आणि आता नवीन वाढ तीन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपयांचे मानधन या अंशकालीन स्त्री परिचारकांना दिले जाणार आहे.
सर्व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंशकालीन स्त्री परिचारांना प्रचलित कार्यपद्धतीनुसार सुधारित मासिक मानधन देण्याची कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश या जीआरच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. याचप्रमाणे दरमहा दहा तारखेपर्यंत मासिक मानधनाची रक्कम अदा करण्याची कारवाई करावी अशा प्रकारचे सुद्धा या जीआरच्या माध्यमातून सूचना निर्देश देण्यात आलेले आहेत.