युरियाच्या किमती वाढल्या ?
Urea Rate update 2026
हाच प्रश्न लोकसभेत उपस्थित करण्यात आला. या संदर्भात उत्तर रसायन व खते मंत्रालयाच्या राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे.
युरियाच्या किमतीत वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारकडे नाही. संतुलित खत वापरला चालना देण्यासाठी व जमिनीचा कस अबाधित रहावा यासाठी धोरणात्मक उपाय म्हणून युरियाच्या गोणीचा आकार कमी करण्यात आल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आली.
युरियाचा वाढता वापर, शेतकऱ्यांना खताचा विचारपूर्वक व कार्यक्षम वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी युरियाची गोणी ५० किलोवरून ४५ किलो व ४५ किलो वरून ४० किलो करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना सध्या बाजारात नीम कोटेड युरियाची गोणी २४२ प्रति गोणी या दरात ( नीम कोटिंग दर व लागू कर वगळता) उपलब्ध आहे.
तर सल्फर कोटेड युरिया ४० किलोची गोणी २५४ प्रति गोणी ( GST वगळता) या दरात उपलब्ध आहे.
शेतकऱ्यांवरती कोणताही अतिरिक्त भार टाकण्याचा केंद्र सरकारचा विचार नसल्याची माहिती त्यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली.