Recent Post

Popular Posts

६ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना ९१८ कोटींचा पीकविमा; वाटप सुरू | Kharip Pikvima 2025

६ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना ₹९१८ कोटींचा पीकविमा मंजूर

दुसऱ्या टप्प्याच वाटप सुरू

Kharip Pikvima 2025

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2025-26 अंतर्गत द्वितीय टप्यात ३८१.३३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरणास सुरुवात

प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) अंतर्गत खरीप हंगाम 2025-26 मध्ये सोयाबीन पिकाच्या नुकसानीसाठी नांदेड जिल्ह्यातील एकूण 93 महसूल मंडळापैकी 85 महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना एकूण 913 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे.

सोयाबीन पिकासाठी जिल्ह्यातील सर्व 93 महसूल मंडळे पात्र ठरली असून 6 लाख 34 हजार 623 शेतकरी अर्जदारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सुमारे ४,४४,८७९.३७ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले होते.

दिनांक १६ मे २०२६ पर्यंतच्या अहवालानुसार सोयाबीन पिकासाठी ८५ महसूल मंडळासाठी एकूण ९१३ कोटी रुपये नुकसानभरपाई निश्चित झाली असून त्यापैकी प्रथम टप्यात माहे एप्रिल २०२६ मध्ये ४१ महसूल मंडळातील सोयबीन पिक विमाधारक शेतकऱ्यांना ४९९.६० कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

आता दुसऱ्या टप्यात ८०:११० कप व कॅप मॉडेलनुसार राज्य शासनाकडील दायित्व ३८१.३३ कोटी रुपये विमा कंपनीकडे नुकतेच जमा करण्यात आले आहेत. यापैकी सोयाबीन पिकासाठी ३८ महसूल मंडळातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना ३८०.७४ कोटी रुपये नुकसानभरपाई वितरणास आज पासून सुरुवात झाली आहे.

जिल्ह्यातील ९३ महसूल मंडळापैकी ७९ महसूल मंडळातील नुकसानभरपाई वाटप पूर्णत्वाकडे जात आहे. उर्वरित १४ महसूल मंडळातील ६ महसूल मंडळातील नुकसानभरपाईचा राज्य शासनाकडील हिस्सा प्रलंबित असून ८ महसूल मंडळाची नुकसानभरपाई निश्चितीची प्रक्रिया सुरु आहे.

नुकसानभरपाई वितरीत करण्यात येत असलेली ३८ महसूल मंडळे:

मालेगाव, भोकर, भोसी, किणी, बिलोली, कुंडलवाडी, देगलूर, खानापूर, मरखेल, धर्माबाद, करखेली, सिरजखोड, निवघा, तळणी, तामसा, जवळगाव, कुरुळा, उस्माननगर, फुलवळ, बोधडी, किनवट, उमरी बा., सावरगाव, शेवडी बा., सोनखेड, मुदखेड, अंबुलगा बु., जांब बु., मुखेड, मुक्रमाबाद, बरबडा, घुंगराळा, नरसी, नांदेड ग्रामीण, तरोडा बु., विष्णुपुरी, वाजेगाव, सिंधी.

राज्य शासनाचा हिस्सा प्रलंबित असलेली ०६ महसूल मंडळे:

कंधार, इस्लापूर, मांडवी, बारड, नांदेड शहर , वसरणी

नुकसानभरपाई निश्चिती प्रक्रियेत असलेली ०८ महसूल मंडळे:

दिग्रस (बु.), जलधारा, सिंदगी (मो.), माहूर, सिंदखेड, वाई बाजार, वानोळा, धानोरा (बु.)

विमा कंपनीच्या अद्ययावत माहितीनुसार सोयाबीन, मुग, उडीद, तूर आणि ख.ज्वारी या सर्व पिकाच्या नुकसानभरपाईसाठी एकूण मंजूर रक्कम ९१८.१८ कोटी रुपये असून प्रथम टप्यात माहे एप्रिल २०२६ मध्ये त्यापैकी ५०२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. उर्वरित ३८१ कोटी रक्कम राज्य शासनाकडून विमा कंपनीला प्राप्त झाली असून पिक विमा धारकांना वितरित करण्याची कार्यवाही सुरु आहे.



वर्धा जिल्हा अपडेट

खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे.

वर्धा जिल्ह्यातील पिक विमा भरलेल्या 62000 शेतकऱ्यापैकी १५३०५ शेतकऱ्यांना 12 कोटी 14 लाख रुपयांचा पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे.


खरीप हंगाम 2025 मध्ये वर्धा जिल्ह्यातील कापूस तूर सोयाबीन व इतर पिकासाठी पिक विमा भरलेल्या 62 हजार 664 शेतकऱ्यापैकी १५३०५ शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकासाठी पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे.

एकंदरीत वर्धा जिल्ह्यातील 29 हजार 782 शेतकऱ्यांनी कापूस पिकाकरिता, 8533 शेतकऱ्यांनी तुर पिकाकरिता, तर 24182 शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाकरता आपला पिक विमा काढला होता. सोयाबीन पिकाचा पिक विमा काढलेल्या 24,182 शेतकऱ्यांपैकी 15305 शेतकऱ्यांना हा पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे.

वर्धा जिल्ह्यातील एकूण 55 महसूल मंडळापैकी 37 महसूल मंडळामध्ये हा पिक विमा मंजूर करण्यात आलेला असून पाच महसूल मंडळामध्ये पिक विमा नामंजूर करण्यात आलेला असून 13 महसूल मंडळामध्ये पीक विम्याच्या नुकसानीची परिगणना सुरू आहे.

मंजूर झालेल्या पीक विम्यामध्ये आर्वी तालुक्यातील सहा महसूल मंडळातील १४३७ शेतकऱ्यांना, आष्टी तालुक्यातील एक महसूल मंडळातील 310 शेतकऱ्यांना, देवळी तालुक्यातील पाच महसूल मंडळातील 3585 शेतकऱ्यांना हिंगणघाट तालुक्यातील ७ महसूल मंडळातील 2908 शेतकऱ्यांना, समुद्रपूर तालुक्यातील ७ महसूल मंडळातील 3129 शेतकऱ्यांना तर सेलू तालुक्यातील ५ महसूल मंडळातील 2041 वर्धा तालुक्यातील ६ महसूल मंडळातील १८९४ शेतकऱ्यांना हा पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे.

कारंजा व आष्टी तालुक्यातील प्रत्येकी दोन आणि वर्धा तालुक्यातील एक अशा पाच महसूल मंडळामध्ये सोयाबीन पिकाकरता पिक विमा लागू झालेला नाही.