MH DCS E peek pahani शेतकऱ्यांची कटकट मिटली! ई पीक पाहणी शासनाचा मोठा निर्णय
शेतकऱ्यांची कटकट मिटली! ई पीक पाहणी शासनाचा मोठा निर्णय
MH DCS E peek pahani
राज्यात खरीप हंगाम 2026 पासून शेतकऱ्यांची ई पाहणी करण्याची कटकट कायमची मिटणार आहे; राज्यात १००% इ पीक पाहणी सहाय्यकाच्या माध्यमातून केली जाणार आहे.
राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2026 मध्ये 15 जुलै 2026 पासूनच केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्वे अप्लिकेशनच्या ( MH DCS ) माध्यमातून राज्यामध्ये किती पाहणी केली जाणार आहे, यावर्षी १००% ई पीक पाहणी करण्यासाठी सहाय्यकाची मदत घेतली जाणार असून 15 जुलै 2026 पासूनच सहायकाच्या माध्यमातून १००% E Peek Pahani करण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारकडून घेण्यात आलेले आहे.
GR PDF 2026
महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुरक्षितीत ठेवणे) नियम, १९७१ मधील नियम २९ व ३० अंतर्गत केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे (DCS MH) या प्रणालीच्या अनुषंगाने पीक नोंदणी प्रक्रियेतील तरतुदीमध्ये सुधारणा
केंद्र शासनाच्या माध्यमातून हे प्रत्येक राज्यांना जमिनीचे क्षेत्रफळ, पिकांची लागवड, पिकांची १००% आकडेवारीची माहिती देण्यासाठीच उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. प्रत्येक राज्यात या ००% माहिती देणे बंधनकारक करून या साठी केंद्र शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जातोय आणि याच अनुषंगाने याच उपलब्ध निधी मधून आता डिजिटल क्रॉप सर्वे अप्लिकेशनच्या ( ) माध्यमातून राज्यामध्ये ही dcs ई पीक पाहणी केली जाणार आहे.
एकंदरीत राज्यातील शेतकऱ्यांना ई पीक पाहणी केली जात असताना अँड्रॉइड मोबाईल नसणे नेटवर्क प्रॉब्लेम किंवा आणखीन बऱ्याच साऱ्या बाबी मुदतीमध्ये ई पीक पाहणी न करणे किंवा शेतकऱ्यांना ई पीक पाहणी बद्दल अवेअरनेस नसणे याबरोबर चुकीच्या पद्धतीने पिकाच्या नोंदी लावून लावल्या जात होत्या याच्यामुळे पिकाचे आकडेवारी सुद्धा काही प्रमाणामध्ये चुकीची येत होती.
या सर्वांच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना हा त्रास होऊ नये यासाठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून संपूर्ण ई पीक पाहणी सहायकाच्या माध्यमातून केले जाणार आहे.
मोठी बातमी! ई-पीक पाहणीचा नवीन GR आला | E-Peek Pahani New GR 2026
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202604101224047519.pdf
या संदर्भात एक GR निर्गमित करण्यात आला असून यामधून प्रत्येक विभागाला प्रत्येक विभागाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेले आहेत तहसीलदारांच्या माध्यमातून प्रत्येक गाव स्तरावर एक सहाय्यकाचे नेमणूक केले जाणार आहे. या सह्हायकाला प्रति प्लॉट दहा रुपये मिश्र पिकासाठी प्रति प्लॉट 12 रुपयाचे मानधन दिल जाणार आहे.
गावांमधील महिला बचत गटातील जे काही सदस्य ई पीक पाहणी सहाय्यकासाठी इच्छुक असतील अशा सदस्याची नेमणूक करून खरीप हन्गामाची ई पीक पाहणी केली जाणार आहे. ई पीक पाहणी अग्रिस्टक शी लिंक असल्याने शेतकरयांना झालेल्या ई पीक पाहणीची माहिती मेसेज द्वारे मिळणार आहे.
या नवीन ई पीक पाहणीत मोठे बदल करण्यात आले आहे याच्यामध्ये पूर्वीचे असलेले अंतराची अट २० मीटरची करण्यात आली आहे, ऑफलाइन पद्धतीने डाटा कॅप्चर करून ऑनलाईन पद्धतीने अपलोड करण्याचे याच्यामध्ये तरतूद आहे असे बरेचसे बदल करून आता पंधरा जुलै 2026 पासून राज्यभरामध्ये ही पाहणी सुरू केले जाणार आहे.
यामुळे शेतकऱ्यांची मोठी कटकट आता मिटणार आहे.
dcs mh epeek pahani 2026 new guidelines