राज्यातील 90.85 लाख शेतकऱ्यांना पीएम किसानचा 23वा हप्ता PM kisan

राज्यातील 90.85 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता 20 June रोजी वितरित होणार

Pm Kisan 23nd installment Update 

Pm Kisan 23nd installment Update


20 June रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23 वा हप्ता वितरित

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ( Pm Kisan ) योजनेअंतर्गत April 2026 ते July 2026 या कालावधीतील 23 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 20 June 2026 रोजी वितरित करण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना अर्थात ज्यांची भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे, बँक खाते आधाराशी संलग्न करणे व ई-केवायसी प्रमाणिकरण या तीन अटी पूर्ण केलेल्या आहेत अशा 91.19 लाख शेतकरी कुटुंबांना 20 June रोजी 23वा हप्ता वितरीत केला जाणार आहे.



यामध्ये 90.85 लाख शेतकऱ्यांना सुमारे 1 हजार 870 कोटी रुपयांचा लाभ थेट हस्तांतरणाद्वारे ( DBT )त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण राज्यातील कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा व तालुका स्तरावरील कृषी कार्यालये, ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC), शेतकरी उत्पादक संघटना (FPO) तसेच सहकारी पतसंस्था (PACS) येथे आयोजित करण्यात येणार आहे. 

नागरी सुविधा केंद्रांवरूनही या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.

कृषी विभाग, महसूल व वन विभाग तसेच ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून https://pmindiawebcast.nic.in या संकेतस्थळावरून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. 

या कार्यक्रमात राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


#PMKisan #PMKisan23rdInstallment #PMKisanYojana #KisanSammanNidhi #PMKisanUpdate #KisanNews #FarmersScheme #eKYC #DBT #agriculturenews

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

17.56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी याद्या प्रसिद्ध | shetkari Karjmafi yadi