वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांसाठी अनुसूचित जमातीच्या व्यक्तींनी अर्ज करण्याचे आवाहन
Tar kumpan scheme 2026
केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना (न्युक्लिअस बजेट योजना) सन 2025-26 अंतर्गत अ गट उत्पन्न निर्मितीच्या योजना क गट मानव साधन संपत्ती विकासाच्या व कल्याणात्मक योजनाचे अर्ज लाभार्थी लॉगीन मधून ऑनलाईन पध्दतीने https://nbtribal.in या संकेतस्थळावरुन मागविण्यात आले होते. तरी आता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी 30 January 2026 पर्यत मुदतवाढ दिली आहे.
या योजनेंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.nbtribal.in ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या कालावधीमध्ये अर्ज सादर न करू शकलेल्या लाभार्थ्यांच्या सोयीसाठी दि. २१ ते दि. ३० जानेवारी २०२६ या कालावधीत अर्ज सादर करण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.
या कालावधीत पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रकल्पांतर्गत समाविष्ट असलेल्या परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व आदिवासी लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करावेत, असे जाहीर आवाहन कळमनुरीचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ. सुनिल बारसे यांनी केले आहे.
वैयक्तिक लाभाच्या योजनांत 100% अनुदानावर काटेरी तार, खाद्य स्टॉल, पीठ गिरणी, शिलाई मशिन, ताडपत्री, वनहक्क जमीनप्राप्त शेतकऱ्यांसाठी तार जाळी, ताडपत्री आदी, तसेच आदिवासी महिला व पुरूष बचत गटांसाठी रेडीमेड होजिअरी गारमेंट आदी बाबी पुरवल्या जातात.
सन 2025-26 मधील न्युक्लिअस बजेट मंजूर योजनांची यादी पुढीलप्रमाणे आहे.
अ-गट उत्पन्न निर्मितीच्या योजना
* 100 टक्के अनुदानावर अदिम कोलाम जमातीच्या शेतकऱ्यांना वन्य जीवापासुन शेतीचे संरक्षण करण्यासाठी तारकुंपनासाठी काटेरीतार व जाळीचे तार घेण्यासाठी अनुदानावर अर्थसहाय्य देणे. तसेच पोल व इतर अनुषंगिक खर्च डीबीटीद्वारे करणे.
* अनुसूचित जमातीतील बांबु प्रोडक्ट प्रशिक्षण प्राप्त बेरोजगार युवक/युवती/महिलांना, बांबु कारागिरांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी 85 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य डीबीटीद्वारे देणे.
* अनुसूचित जमातीच्या महिलांना टु इन वन शिवनयंत्र घेण्यासाठी 85 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य डीबीटीद्वारे देणे.
* आदिम कोलाम जमातीच्या महिलांना टु इन वन शिवनयंत्र घेण्यासाठी 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य डीबीटीद्वारे देणे.
* अनुसूचित जमातीच्या दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी 85 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य डीबीटीद्वारे देणे.
* 85 टक्के अनुदानावर आदिवासी महिला बचतगटास कागदापासून पत्रावळी प्लेट व द्रोण तयार करण्याचे मशीन डीबीटीद्वारे पुरविणे.
* 85 टक्के अनुदानावर आदिवासी लाभार्थ्यांना मल्टीपर्पज पिठगिरणी घेण्यासाठी अर्थसहाय्य डीबीटीद्वारे करणे.
* 100 टक्के अनुदानावर आदिवासी लाभार्थ्यांना मल्टीपर्पज पिठगिरणी घेण्यासाठी अर्थसहाय्य डीबीटीद्वारे करणे.
•अनुसूचित जमातीच्या ब्युटी पार्लर प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना ब्युटी पार्लरचे दुकान लावण्यासाठी 85 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य डीबीटीद्वारे देणे.
•100 टक्के अनुदानावर आदिम जमातीच्या कोलाम लाभार्थ्यांना विविध व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य डीबीटीद्वारे देणे.