बांधकाम कामगारांसाठी तीन नवीन योजना | Bandhkam kamgar yojana

बांधकाम कामगारांसाठी अर्थसहाय्याच्या तीन नवीन योजनांना मंजुरी

Bandhkam kamgar yojana 

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती

GR PDF 

Bandhkam Kamgar Pension Yojana Arj Namuna PDF

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरीता तीन नवीन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात असून या तीन नवीन योजनांमध्ये 



  1. बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाकरीता 51 हजार रुपये देण्यात येणार आहे. 
  1. बांधकाम कामगाराचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याचे शव मूळ गावी पाठविण्यासाठी वाहतुकीचा खर्च मंडळ करणार आहे  
  1. बांधकाम कामगाराचा अपघात होऊन हात किंवा पाय निकामी झाल्यास कृत्रीम हात किंवा पाय बसविण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

मंडळाकडे नोंदीत बांधकाम कामगारांकरीता शैक्षणिक सहाय्य, सामाजिक व सुरक्षा, आरोग्यविषयक व अर्थसहाय्याच्या एकूण 29 विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. आता या योजनांशिवाय नवीन तीन कल्याणकारी योजना मंजूर करण्यात आलेल्या आहेत.

मंडळाने माहे जुलै 2020 पासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, नुतनीकरण व लाभ वाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यातील बांधकाम कामगारांना मंडळाच्या www.mahabocw.in या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, नुतनीकरण व विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.



मंडळाकडे जमा होत असलेल्या उपकर निधीमधून मंडळामार्फत बांधकाम कामगारांच्या पाल्याकरीता इयत्ता पहिली पासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत अर्थसहाय्य, अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाकरीता विशेष सहाय्य, बांधकाम कामगारांचा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास अर्थसहाय्य, बांधकाम कामगारांच्या घराकरीता अर्थसहाय्य, बांधकाम कामगारांची प्रसूती तसेच गंभीर आजाराकरीता अर्थसहाय्य यासह एकूण 29 कल्याणकारी योजनांचा लाभ थेट बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचे वाटप करण्यात येत आहे.

मंडळामार्फत कोविड-19 विषाणू प्रादुर्भाव कालावधीत राज्यात मध्यान्ह भोजनासह रात्रीचे भोजन वितरित करण्यात येत आहे. ही योजना कोविड विषाणू कालावधीत फार उपयुक्त ठरल्यामुळे कामगारांमध्ये लोकप्रिय झालेली आहे. सदर योजनेमुळे कोविड-19 विषाणू प्रादुर्भाव कालावधीत स्थलांतर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. मध्यान्ह भोजन योजना राबविल्याबाबत कामगार व कामगार संघटनांकडून मंडळाचे अभिनंदन होत असल्याचे नमूद करून बांधकाम कामगारांकरिता नव्याने घोषित तीन योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचेही निर्देश मंत्री श्री.मुश्रीफ यांनी मंडळाला दिले आहेत.