सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू.
Assk registration 2026
Aple sarkar seva kendra |
नागरिकांना सेवा सोबत तरुणांना रोजगाराचा एक नवा पर्याय देखील उपलब्ध होतो.
‘आपले सरकार सेवा केंद्र’ करिता अर्ज मागविले.
आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात -2026 जिल्हा Chandrapur
चंद्रपूर जिल्ह्यात नवीन आपले सरकार सेवा केंद्र देण्यासाठी रिक्त असलेल्या 633 ठिकाणाकरिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
यासाठी परिपूर्ण भरलेला अर्ज व आवश्यक प्रमाणपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रतींसह अर्ज दिनांक 20 मार्च 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत सेतू शाखा जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही.
अर्जाचा नमुना, संपूर्ण जाहिरात, आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याची प्रक्रिया, अटी व शर्ती तसेच अर्जासोबत सादर करावयाच्या आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती
👇👇
ग्रामपंचायत स्तरावर रिक्त असलेल्या ठिकाणी नविन आपले सरकार सेवा केंद्र वितरीत करण्याबाबत जाहीरनामा
https://cdn.s3waas.gov.in/s3fc221309746013ac554571fbd180e1c8/uploads/2026/03/17724461096315.pdf
अर्ज स्वीकृतीची तारीख दि. 20 मार्च सायंकाळी 6 वाजेपर्यंत
आपले सरकार सेवा केंद्र (महा ई-सेवा केंद्र) मंजूर करणेबाबत.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील युवक-युवती तसेच दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. रिक्त गावांच्या एकूण जागांपैकी 5 टक्के जागा दिव्यांग व्यक्तींना प्राधान्याने देण्यात येणार आहेत. सदर जाहिरात, रिक्त गावांची यादी तसेच अटी व शर्तींबाबत सविस्तर माहिती चंद्रपूर जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर https://chanda.nic.in/ उपलब्ध आहे.
संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या जागांमध्ये वा वेळापत्रकांमध्ये बदल करण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकारी तथा जिल्हा सेतू समिती अध्यक्ष यांचेकडे राखीव आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तरी इच्छुकांनी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्य माहिती व तंत्रज्ञान विभाग व सामन्य प्रशासन विभागाच्या वतीने शासन निर्णयाअन्वये केंद्रशासनाच्या राष्ट्रीय ई- गव्हर्नन्स कृती कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण व शहरी भागात नागरिकापर्यंत शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवा पोहचविण्यासाठी शासनाच्या वतीने आपले सरकार सेवा केंद्रे हे प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात नगरपंचायत कार्यक्षेत्रात नगर परिषद कार्यक्षेत्रात व तसेच महानगर पालिका कार्यक्षेत्रात आपले सरकार सेवा केंद्रे स्थापीत करणे बाबतचा उक्त शासन निर्णयाव्दारे निर्णय घेण्यात आलेला आहे.
आपले सरकार सेवा केंद्रासाठी अटी व शर्ती पूढील प्रमाणे आहेत.- आपले सरकार सेवा केंद्रामार्फत महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 19 जानेवारी 2018 मधील परीशिष्ट क मध्ये नमुद केलेल्या सर्व सेवा नागरीकांना देणे आवश्यक आहे. या शासन निर्णयातील परीशिष्ट ड मध्ये नमुद केलेल्या विहीत नमुन्याप्रमाणे आपले सरकार सेवाकेद्राचा बोर्ड / फलक लावणे आवश्यक आहे.
आपले सरकार सेवा केंद्र मंजूर ठिकाणीच चालविण्यात यावे अन्यथा इतर ठिकाणी आढळून आल्यास त्यांचेवर कार्यवाही करण्यात येईल. नागरीकांकडून स्वकारण्यात येणाऱ्या पेमेंटसाठी ई-सुविधा उपलब्ध् करुन दयाव्यात, डिजिटल पेमेंटला प्राधान्य देणे. शासनाने ठरवुन दिलेल्या वेळापत्रकानुसार आपले सरकार सेवा केद्र चालु ठेवुन नागरीकांना सेवा पुरविणे.
शासनाने ठरवून दिलेल्या कॉमन ब्रॅडींगचा वापर करणे तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाने स्थापन केलेल्या हेल्पलाईन क्रमांकाचा तपशील आपले सरकार सेवा केंद्राच्या दर्शनी भागावर प्रसिध्द करणे.
शासनाने ठरवून दिलेले दर केंद्राच्या दर्शनी भागावर प्रसिध्द करणे तसेच ठरवुन दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकारणी न करणे.
शासनाने पुरविलेल्या वस्तू आज्ञावली इ. चे वापर संरक्षण जतन करणे. सर्व ग्राहकांना सौजन्याची वागणुक देणे आणि आवश्यक मदत व सहकार्य करणे.
विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत ठरवुन दिलेले वेळापत्रक व निर्देश काटेकारेपणे पाळणे.
ज्या अर्जदारांकडे CSC ID नाहीत अशा अर्जदारांनी CSC ID काढणे आवश्यक आहे.
आपले सरकार सेवा केद्र स्थापन करण्यासाठी संबंधित गावातील इच्छुक अर्जदाराने विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास करु शकतात.