Pm Kisan 24 वा हप्ता वितरणापूर्वी शेतकऱ्यांसाठी गोड खबर; लाभार्थी संख्येत वाढ
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 24 वा हप्ता वितरणापूर्वी शेतकऱ्यांसाठी गोड खबर; लाभार्थी संख्येत वाढ
Pm Kisan 24rd Instalment
साधारणत ऑक्टोबर महिन्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील अर्थात 24 वा हप्ता वितरित केली जाण्याची शक्यता आहे.
हा पीएम किसान 24 वा हप्ता वितरित केला जात असतानाच एक मोठी खुशखबर येत आहे. या योजनेच्या अंतर्गत 32 लाख लाभार्थी हे या 24 व्या हप्त्यासाठी ( Pm Kisan 24th Installment ) नव्याने पात्र होत आहेत. देशभरामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत २८ जूनपर्यंत KYC साठी विशेष अभियान राबविण्यात आले होते.
याचप्रमाणे राज्यामध्ये पीएम किसानचा 23 वा हप्ता 88.90 लाख शेतकऱ्यांना हा हप्ता वितरित करण्यात आला होता. मात्र आता 24 वा हप्ता वितरित केला जात असताना 91 लाखापेक्षा जास्त लाभार्थी यांच्यामध्ये पात्र होण्याची शक्यता आहे, याच्या संदर्भातील आकडेवारी राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून जाहीर केली जाईल.
एक मोठा दिलासा या शेतकऱ्यांना आता मिळणार आहे. याचप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या संदर्भातील देखील मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत, लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून या संदर्भातील काही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
