खताचे बुकिंग २ मिनिटात; शेतकऱ्यांसाठी Framework for Fertilizer Sale Application

आता शेतकऱ्यांना खताचे बुकिंग ऑनलाईन करता येणार, कृषी विभागाची नवी प्रणाली

Framework for Fertilizer Sale Application

खताचे होणारे लिंकिंग, शेतकऱ्यांना वेळेत खात न देणे इत्यादी अनेक समस्यांवर मात करण्यासाठी कृषी विभागाने एक प्रकल्प हाती घेतला आहे.

महाराष्ट्र शासन, कृषि विभाग अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला योग्य खत मिळवून देण्यासाठी 'खत विक्रीसाठी आराखडा' तयार करण्यात आला आहे. आता खत खरेदी प्रक्रिया अधिक स्मार्ट, सोपी आणि पारदर्शक झाली आहे !

FRAMEWORK FOR FERTLIZER SALE या मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे खताचे बुकिंग प्रायोगिक तत्त्वावर छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्याकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे.


या उपक्रमाचे मुख्य मुख्य फायदे:

  1. वेळेवर उपलब्धता: खतांची वेळेवर आणि सहज उपलब्धता.
  2. बचत: वेळ आणि कष्टांची मोठी बचत.
  3. सोपी पद्धत: जवळचे खत केंद्र शोधून QR कोड/टोकन स्कॅनद्वारे थेट खरेदी.
  4. गुणवत्ता: खतांची गुणवत्ता आणि शुद्धतेची संपूर्ण खात्री.

खत बुकिंग आणि वितरणाच्या प्रक्रिया ३ प्रकारात 

  • स्तर १: शेतकरी आयडी (Farmer ID) असलेले शेतकरी.
  • स्तर २: शेतकरी आयडी नसलेले शेतकरी (जमिनीच्या तपशिलानुसार अर्ज करू शकतात).
  • स्तर ३: खंडाने आणि बटाईने (वाटेकरी) शेती करणारे शेतकरी (यांनाही मिळणार विशेष लाभ!).
🤝अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या कृषि केंद्राशी संपर्क साधा.

#महाराष्ट्रशासन #कृषिविभाग #शेतकरीयोजना #खतविक्रीआराखडा #बळिराजा #कृषिमाहिती #शेतकरीप्रगती
 #FarmersOfMaharashtra #AgricultureDepartment #KhatVatp #SmartFarming #MahaAgri

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map