Ladki Bahin EKyc Problem
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची योजनेच्या निकषानुसार लाभार्थी पात्र, अपात्र आहेत, याची फेरपडताळणी अंगणवाडी सेविकामार्फत करण्याचे शासनाने 20 जानेवारी 2026 च्या पत्रान्वये निर्देश दिले आहेत.
सदर योजनेंतर्गत वय, लिंग व कुटुंबातील सदस्याच्या नोकरी/सेवानिवृत्ती संदर्भातील विहित निकषानुसार अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी केली जाणार आहे.
राज्यातील लाभ बंद झालेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी अंगणवाडी सेविकेकडे कागदपत्र सादर करावी.
गावातील अंगणवाडी सेविकेकडे लाभ बंद झालेल्या महिलांची यादी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत हप्ता बंद झालेल्या महिलांची 27 जानेवारी पासून कागदपत्र स्विकारन्यास सुरुवात झाली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला आर्थिक लाभ देण्यासाठी पात्रता, अपात्रतेचे निकष निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार योजनेतील पात्र लाभार्थी महिलेला आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरद्वारे दरमहा आर्थिक लाभाची रक्कम अदा करण्यात येते
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकडून ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करतांना लाभार्थी महिलांकडून पर्याय निवडतांना व इतर कारणांमुळे चुकीचा पर्याय निवडल्या गेल्याने त्यांचा लाभ बंद झाल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहे.
योजनेच्या निकषानुसार सदर लाभार्थी पात्र, अपात्र आहे याची पडताळणी होणे गरजेचे आहे.
त्याअनुषंगाने गावपातळीवर ई-केवायसी प्रक्रीयेमध्ये लाभ बंद झालेल्या महिला लाभार्थ्यांचे अर्ज स्विकारणे, तपासणी करण्याकरीता ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका तसेच शहरी भागामध्ये वॉर्ड ऑफिसर व अंगणवाडी सेविकांमार्फत योजनेतील निकषाच्या अनुषंगाने कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
ई-केवायसी प्रक्रीये मुळे लाभ बंद झालेल्या महिलांची यादी त्यांच्या क्षेत्रातील, गावातील, शहरी भागातील अंगणवाडी सेविकांना प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लाभार्थी महिलांनी दि.27 जानेवारीपासून जवळच्या अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्र, स्वयंघोषणापत्र सादर करावे.