Aple Sarkar Yadi आपले सरकार सेवा केंद्रासाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर

आपले सरकार सेवा केंद्रासाठी पात्र उमेदवारांची कागदपत्र तपासणी व मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर

Aple Sarkar Yadi 

पात्र अर्जदारांनी कागदपत्रे तपासणी व मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 430 आपले सरकार सेवा केंद्रासाठी दि. 3 ते 12 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या.  या मुलाखत  प्रक्रियेचा अंतिम निकाल दि. 17 April 2026 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर https://hingoli.nic.in/⁠ येथे जाहीर करण्यात आला आहे.

प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र व अपात्र अर्जदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://hingoll.nic.in/) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील रिक्त आपले सरकार सेवा केंद्रांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार हिंगोली शहरातील ७ केंद्रे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील रिक्त ४२३ केंद्रांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. अशा प्रकारे एकूण ४३० केंद्रांसाठी अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली.

दि. २ जानेवारी २०२६ अखेर प्राप्त झालेल्या एकूण ३१०१ अर्जांची छाननी करण्यात आली. त्यानंतर मुलाखतीस पात्र ठरलेल्या १८६१ उमेदवारांच्या मुलाखती दि. ३ फेब्रुवारी २०२६ ते दि. १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या.


सर्व प्रक्रियेनंतर अंतरिम गुणवत्ता यादीत काही प्रमाणात बदल करण्यात आले असून काही उमेदवारांच्या गुणवत्ता क्रमांकात सुधारणा झाली आहे. त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अंतिम गुणवत्ता यादीबाबत कोणत्याही उमेदवारास हरकत अथवा आक्षेप असल्यास त्यांनी दि. २० एप्रिल २०२६ ते दि. २२ एप्रिल २०२६ या कालावधीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे उमाकांत मोकरे, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, आयटी सेल यांच्याकडे अर्ज सादर करावेत.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map