महिला बचत गटांना सुवर्णसंधी; २४ लाखापर्यंत मिळणार अनुदान || SHG Farm Machinery Bank

महिला बचत गटांना सुवर्णसंधी; मिळणार २४ लाखापर्यंत अनुदान.

SHG Farm Machinery Bank 

राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 हा प्रकल्प २१ जिल्ह्यातील ७२०१ पेक्षा जास्त गावात राबविला जात आहे. हा टप्पा महाराष्ट्र शासन व जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी यंत्र अवजारे खरेदी करणे परवडत नाही पर्यायाने यांत्रिकीकरणाचा वापर करण्यास मर्यादा निर्माण होतात.


याच पार्श्वभूमीवर राज्यात एक गाव एक कृषी अवजारे बँक ही संकल्पना राबवली जात आहे. या संकल्पनेअंतर्गत गावातील नोंदणी कृत महिला बचत गटांना कृषी अवजारे बँक दिली जात आहे.

या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदानित कृषी यंत्र अवजारे भाडे तत्वावर उपलब्ध होणार आहे. यामुळे कृषी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे शक्य होणार आहे.



कृषी अवजारे बँक पात्रता

* प्रकल्प गावातील उमेद व माविम पुरस्कृत महिला बचत गट
* महिला गाव संघ
* गटात किमान 10 महिला सदस्य (वेगवेगळ्या कुटुंबातील) ⁠

कृषी अवजारे बँक अनुदान

* प्रकल्प मूल्याच्या 60% पर्यंत अनुदान
* कमाल अनुदान मर्यादा : ₹24 लाख

कृषी अवजारे बँक अर्ज कसा कराल

इच्छुक महिला बचत गटांनी खालील संकेतस्थळावर 5 एप्रिल 2026 पर्यंत  ऑनलाईन अर्ज करावा :



📍 महत्वाची सूचना :

एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हा स्तरावर ऑनलाईन लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवड केली जाईल. ज्या गटांना यापूर्वी कृषी अवजारे बँकेसाठी लाभ मिळाला आहे ते गट पात्र राहणार नाहीत. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.



या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map