महापालिका निवडणूक होताच शासनाचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! || Cabinet Decision

महापालिका निवडणूक होताच शासनाचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय!

Cabinet Decision Maharashtra 

राज्यात महानगरपालिका निवडणुका पार पडताच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.

या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले, यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक व आशादायी असा एक निर्णय घेण्यात आला तो म्हणजे भाजीपाला व फळे यांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी मल्टी मॉडेल हब ( Multi Model Hub terminal market ) उभारणी साठी मंजुरी देण्यात आली आहे.

यामुळे आता भाजीपाला निर्यातीकरिता शेतकऱ्यांसाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे बापगांव (ता. भिंवडी) येथे सर्वोपयोगी – मल्टी मॉडेल हब व टर्मिनल मार्केटची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य कृषि पणन महामंडळाला ७ हेक्टर ८० आर जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे.


महसूल विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात या जागेवर जागतिक बँक व महाराष्ट्र शासन यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) या प्रकल्पाच्या माध्यमातून हब, टर्मिनल उभारण्यात येणार आहे. 

हा हब उभारणी साठी राज्य सरकारने ९८ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला गेला आहे.

या प्रकल्पात व्हेपर हिट ट्रीटमेंट, प्लॅंट विकीरण, पॅक हाऊस सुविधा तसेच फळे- भाजीपाला साठवणुकीकरिता सुविधांची उभारणी केली जाणार आहे. याठिकाणी आंबा, मसाले, पशुखाद्य यांच्यावर विकीरण प्रक्रियेद्वारी निर्जलीकरण करणे अशा प्रक्रिया केल्या जाणार आहेत.

या मल्टी मॉडेल हब टर्मिनल मध्ये दरवर्षी एक लाख टन शेतमालाची हाताळणी करणे शक्य होणार आहे. 

यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी सुविधा निर्माण होणार आहे. या प्रकल्पामुळे शेतमाल निर्यातीस प्रोत्साहन मिळणार आहे. शेतमालाची गुणवत्ता सुधारणे, प्रक्रिया करणेची सुलभ होणार आहे. याठिकाणी व्यापारी व निर्यातदार यांना एकाच छताखाली आणले जाणार आहे.