ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा या करिता ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांचे ऊसतोड कामगार असल्याचे प्रमाणपत्र देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती,
आणि याच अनुषंगाने २१ सप्टेंबर २०२१ एक महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून
राज्यातील ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्याला आहेत व जे सतत मागील 3 वर्षे ऊसतोड ustod कामगार म्हणून काम करत आहेत, अशा कामगारांची संबंधित गावातील, वस्त्यामधील, तड्यामधील, पाड्यामधील ग्रामसेवकांनी नोंदणी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत,
aaa
ऊसतोड कामगारांचे नाव, आधार कार्ड, फोटो, बँक खाते, रेशन कार्ड यांसारख्या काही कागदपत्रांची या नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यकता भासणार आहे.
तसेच ज्या ऊसतोड कामगारांनी अलीकडच्या काळात उसतोडणीचे काम बंद केले मात्र पूर्वी ते ऊसतोडणी करत होते, अशा कामगारांचीही नोंदणी याद्वारे करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
याबाबतचा शासन निर्णय व सोबतच नोंदणी करावयाचा नमुना फॉर्म व ओळखपत्राचा नमुनादेखील निर्गमित करण्यात आला असून, प्रत्येक जिल्ह्यात ग्रामसेवकामार्फत ही नोंदणी पूर्ण केली जाणार आहे.