वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या कर्ज योजनेची मर्यादा आता रुपये १ लाख रुपये || VJNT loan scheme 2022

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या कर्ज योजनेची मर्यादा आता रुपये १ लाख रुपये

शासन निर्णय निर्गमित 

Vasantrao Naik Vimukt Jati & Bhatkya Jamati Vikas Mahamandal Limited LOAN Scheme 2021
Vasantrao Naik Vimukt Jati & Bhatkya Jamati Vikas Mahamandal Limited LOAN Scheme 2021
Vasantrao Naik Vimukt Jati & Bhatkya Jamati Vikas Mahamandal Limited LOAN Scheme 2021


वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची 119 वी  बैठक  बहुजन कल्याण मंत्री श्री. वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात पार पडली. संचालक दिलीप हळदे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आनंद माळी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत संचालक मंडळाच्या 118 व्या सभेच्या इतिवृत्तास व केलेल्या कार्यवाहीस  मान्यता देण्यात आली. महामंडळाच्या नियमित आस्थापनेवरील रिक्त असलेली  पदे भरण्यास मंजुरी, नियमित आस्थापनेवरील अधिकारी  कर्मचारी यांना पदोन्नती आदी विषय मंजुरीसाठी बैठकीत मांडण्यात आले.

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची यापूर्वीची रुपये 25 हजार रु. थेट कर्ज योजनेची मर्यादा रुपये १ लाख पर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आली असून वसंतराव  नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातील रिक्त पदे भरण्यास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. रिक्त पदासंदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश यावेळी श्री.वडेट्टीवार यांनी दिले.

बैठकीत महामंडळाच्या नियमित आस्थापनेवर  एकूण 96  पदे मंजूर असून  रिक्त पदे भरण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली. महामंडळाच्या बीज भांडवल कर्ज योजना व राष्ट्रीय मागासवर्ग वित्त विकास महामंडळ, नवी दिल्ली या दोन्ही योजनांची वसुली वाढविण्याकरिता थकित कर्जावरील व्याजाच्या रकमेत ५० टक्के सवलत लागू करणे आणि महामंडळाची यापूर्वीची रुपये 25 हजार थेट योजनेची मर्यादा रुपये 1 लाख पर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे.


वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ
कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन


शासनाचा उपक्रम असलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ(मर्या.) तर्फे विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लोकांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या  वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना तसेच अन्य कर्ज योजनेकरिता अर्ज सुरु झाले आहेत, या  योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एच. जी. आत्राम यांनी केले आहे. 

महामंडळाच्या सर्व योजनांची माहिती www.vjnt.in या संकेतस्थळावर  प्रसिद्ध करण्यात आली आहे. महामंडळाच्या बीज भांडवल कर्ज योजना, थेट कर्ज योजना या ऑफलाईन असून या योजनांसाठी अर्ज विक्री महामंडळाचे जिल्हा कार्यालय, पहिला माळा, वैष्णवी कॉम्प्लेक्स, पॉवर हाऊस समोर, गोरक्षण रोड, अकोला- दूरध्वनी- 0724-2459937 येथे सुरु आहे. 

थेट कर्ज योजनेचा अर्ज घेण्यासाठी अर्जदाराला  सोबत आधार कार्ड, जातीचा दाखला, रेशन कार्ड सोबत आणावे लागेल. 

ज्या व्यवसायासाठी कर्ज हवे असेल त्या व्यवसायाचे प्रशिक्षण घेतलेल्या तसेच विधवा, निराधार महिलांना प्राधान्य देण्यात येईल,असेही कळविण्यात आले आहे. 

अर्ज विक्री, अर्ज स्विकारणे यासाठी स्वतः अर्जदाराने हजर राहणे आवश्यक असून कोणत्याही मध्यस्थामार्फत अर्ज विक्री वा अर्ज स्विकारणे केले जात नाही,असे जिल्हा व्यवस्थापक आत्राम यांनी स्पष्ट केले आहे.

VJNT loan scheme 202