सावधान ! कुसुम सोलर योजनेचा अर्ज भरताय; हे पहा || farmer notice kusum solar fake websites

नविन व् नवीनीकरण ऊर्जा मंत्रालयाचे शेतकऱ्यांना  आवाहन 





 नविन न नवीनीकरण ऊर्जा मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे की, अनेक बनावट वेबसाईट आणि मोबाईल अप्लिकेशन च्या माध्यमातून अर्जदारांना  प्रधानमंत्री किसान उर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (प्रधानमंत्री- कुसुम योजना ) यांच्या नावाने शेतकऱ्यांकडून सौर पंप बसवण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास, पंपाची नोंदणी फी आणि खर्चासह ऑनलाइन पैसे भरण्यास सांगितले जात आहे. 

ज्याच्या मधील काही वेबसाइट  * .org, * .in, * .com  ने नोंदणीकृत आहेत 

उदाहरण  www.kusumyojnaonline.in.net, www.pmkisankusumyojna.co.in, www.onlinekusamyojna.org.in, www.pmkisankusumyojna.com 

त्यामुळे प्रधानमंत्री-कुसुम योजनेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना फसव्या वेबसाईटला भेट देऊ नका आणि कोणतेही पैसे देऊ नका असा सल्ला नविन न नवीनीकरण ऊर्जा मंत्रालया दिला आहे. राज्य सरकारच्या विभागांकडून प्रधानमंत्री-कुसुम योजना राबवली जात आहे.

अधिकृत वेबसाईट खाली आहेत .

kusum solar yojana login link

https://kusum.mahaurja.com/solar/benf_login

kusum mahaurja website registration link

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B



योजनेच्या अधिक तपशीलांसाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या (MNRE) अधिकृत वेबसाइट www.mnre.gov.in ला भेट द्या

अथवा टोल फ्री नंबर 1800-180-3333 डायल करा