अन्यथा हे शेतकरी राहणार कर्जमाफी पासून वंचित || Shetkari Karjmafi 2026

थकीत कर्जदार शेतकऱ्यांचे आधार अपडेट प्रलंबित;कर्जमाफीच्या लाभासाठी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन

Shetkari Karjmafi 2026

राज्यात खरीप हंगाम 2025 मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्ती च्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून शेती क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी प्रस्तावित कर्ज निवारण योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यात थकीत कर्जदार शेतकरी सभासदांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्यापही विविध जिल्ह्यातील हजारो शेतकरी सभासदांचे आधार क्रमांक प्राप्त झाले नसल्याने त्यांच्या कर्जमाफीच्या प्रक्रियेत तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे.





शासनाच्या प्रस्तावित कर्जमाफी पोर्टलवर राज्यातील लाखो शेतकऱ्यांची खाती नोंदवण्यात आली आहेत.

यात प्राथमिक कृषी पत पुरवठा सेवा सहकारी संस्थांचे थकीत कर्जदार आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा स्तरावरील कर्जदार अशा कर्जदार सभासदांची आधार कार्ड माहिती अद्याप अप्राप्त आहे

विहित नमुना प्रपत्र 'अ' व 'ब' मध्ये ही माहिती भरण्याचे काम सध्या सेवा सहकारी संस्था आणि बँक स्तरावर सुरू आहे.


ज्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक प्रलंबित आहेत, त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास त्यांना प्रस्तावित योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.

त्यामुळे संबंधित सर्व शेतकरी सभासदांनी आपल्या संस्थेचे सचिव, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वसुली अधिकारी किंवा तालुका उप/सहायक निबंधक कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा.

संपर्काच्या वेळी आपले आधार कार्ड व आवश्यक कागदपत्रे सादर करून आपली माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन सहकार विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.




या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map