१००% अनुदानावर पिठाची गिरणी सह किराणा दुकान, रसवंती अर्ज सुरू || Adivasi Vikas Yojana

१००% अनुदानावर पिठाची गिरणी सह किराणा दुकान, रसवंती अर्ज सुरू

Adivasi Vikas Yojana 2026

राज्यात आदिवासी विकास विभागाच्या वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. यातीलच काही बाबींचा लाभ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण अंतर्गत सटाणा, मालेगाव व नांदगाव या तालुक्यांसाठी जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ या वर्षांकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत.

प्रकल्प कार्यालयाच्या वतीने कळवण प्रकल्प कार्यालय कार्यक्षेत्रातील अनुसूचित पारधी जमातीच्या लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

लाभार्थी या योजनेकरीता 23 फेब्रुवारी ते 10 मार्च २०२६ पर्यंत अर्ज करू शकतील.



2025 -26 करिता राबविल्या जाणाऱ्या योजना

  1. अनुसूचित जमाती अंतर्गत  पारधी जमातीच्या लाभार्थ्यांना किराणा दुकान व्यवसायासाठी साहित्य खरेदीसाठी १००% अर्थसहाय्य अथवा साहित्याचा पुरवठा.
  1. अनुसूचित जमाती अंतर्गत पारधी जमातीच्या लाभार्थ्यांना १००% अनुदानावर पिठाची गिरणी  अथवा साहित्य पुरवठा.
  1. अनुसूचित जमाती अंतर्गत पारधी जमातीच्या १००% अनुदानावर रसवंती गृहाचे वाटप.
  1. अनुसूचित पारधी जमातीच्या बेरोजगार युवकांना उत्पन्न वाढीसाठी इलेक्ट्रिक दुकानासाठी १०० टक्के अनुदानावर साहित्य खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे, अथवा साहित्याचा पुरवठा.
  1. पारधी जमातीच्या बेरोजगार युवतींना कटलरी व ब्युटीपार्लर व्यवसायासाठी साहित्य खरेदीसाठी १००% अनुदान


या बाबींकरिता कळवण प्रकल्प कार्यालय क्षेत्रातील सटाणा, मालेगाव व नांदगाव तालुक्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज २३ फेब्रुवारी ते १० मार्च २०२६ या कालावधीत अर्ज करावेत.

यासाठी अर्ज सटाणा, मालेगाव व नांदगाव तालुक्यातील गट विकास अधिकारी कार्यालयात शासकीय सुटी वगळून इतर दिवशी उपलब्ध होतील. योजनेच्या लाभकरिता विहित मुदतीत सर्व कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प कार्यालय, कळवण येथे सादर करावेत.

लाभार्थी पात्रता व कागदपत्र

  1. योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार अनुसूचित जमातीचा असावा.
  1. बँक खात्याला आधार लिंक असावा.
  1. यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.


योजनांच्या लाभकरिता अर्जासोबत पुढील कागदपत्र जोडावीत 

  • जातीचा दाखला, 
  • आधार कार्ड, 
  • रेशन कार्ड, 
  • अर्जदाराचे राष्ट्रीयीकृत बँक खात्याचे पासबुक झेरॉक्स, 
  • उत्पन्नाचा दाखला (२०२५ ),
  •  बीपीएल दाखला, 
  • लाभार्थी अंपग, विधवा, परितक्त्या असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र
  • मतदान कार्ड, 
  • पॅन कार्ड, 
  • २ पासपोर्ट साईज फोटो.
  •  यापूर्वी योजनेचा लाभ घेतला नसल्याचे स्वयंघोषणापत्र.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map