Recent Post

Popular Posts

E-Peek Pahani 2026: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! उन्हाळी हंगामाची ई-पीक पाहणी सुरू

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! उन्हाळी हंगामाची ई-पीक पाहणी सुरू

E Peek Pahani 2026

राज्य शासनाच्या माध्यमातून उन्हाळी ई पीक पाहणी सुरू करण्यात आलेली आहे. उन्हाळी हंगाम 2025 26 करिता शेतकऱ्यांना आता एपिक पाहणे मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे आपल्या उन्हाळी पिकांची ई पीक पाहणी करता येणार आहे.

उन्हाळी ई पीक पाहणी ही शेतकऱ्यांना 8 एप्रिल ते 24 मे 2026 या कालावधीमध्ये करता येणार आहे तर 25 मे 2026 पासून राज्यामध्ये सहाय्यक स्तरावर ई पीक पाहणी केली जाईल.


शेतकरी आपल्या या उन्हाळी हंगाम ई पीक पाहणी मध्ये शेतात उभी असलेली पिकं तसेच कायम पड ज्याच्यामध्ये विहीर असेल बोर असेल किंवा इतर काही पडी असतील तसेच चालू स्थितीमध्ये पड असलेल्या जमिनी याची नोंद करू शकतात.

शेतकऱ्यांनी पिकांची ई पीक पाहणी न केल्यास सातबारा उतारा वरती पीक नोंदी कोऱ्या राहतील आणि त्या मुदत संपल्यानंतर शेतकऱ्यांना भरता येणार नाही.

याच्यामुळे अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्तीच्या काळात मिळणारी मदत शासकीय अनुदान किंवा योजनांचे लाभ घेताना लागणाऱ्या पिकांच्या नोंदी या सर्वांमुळे शेतकऱ्यांचे भविष्यात नुकसान होऊ शकतं यामुळे विहित मुदतीमध्ये शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी करावी असा आवाहन शासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.


मोठी बातमी! ई-पीक पाहणीचा नवीन GR आला | E-Peek Pahani New GR 2026

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202604101224047519.pdf