शासनाचा मोठा निर्णय! आता या आमदार खासदारांचा सॅल्युट बंद
Protocol for MPs and MLAs
राज्यात शासकीय कार्यालयात लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांना दिल्या जाणाऱ्या विशेष वागणुकीच्या संदर्भात शासनाच्या माध्यमातून काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा शासन निर्णय 28 एप्रिल 2026 रोजी घेण्यात आलेला आहे.
राज्यात 20 नोव्हेंबर 2025 च्या शासन निर्णयानुसार लोकप्रतिनिधी आमदार खासदार कार्यालयात आल्यानंतर तिथे ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांनी उभे राहून त्यांचे स्वागत करणे बंधनकारक होते.
मात्र राज्य शासनाच्या माध्यमातून 28 एप्रिल 2026 रोजी याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत आता नव्या नियमानुसार जर एखादा लोकप्रतिनिधी आमदार खासदार याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल झाला असेल किंवा इतर प्रकरणांमध्ये तो दोषी ठरलेला असेल. असा एखादा लोकप्रतिनिधी जर त्या प्रकरणाच्या चौकशीसाठी अपीलकार म्हणून पक्षकार म्हणून किंवा चौकशीसाठी बोलवल्यानंतर आलेला असेल तर अशा लोकप्रतिनिधीला येतेवेळी आणि जातेवेळी अभिवादन करण्याची आवश्यकता नाही.
याचप्रमाणे एखादा लोकप्रतिनिधी निवडणुकी प्रक्रिये दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तो मागे घेण्यासाठी अर्जाच्या छाननीसाठी किंवा इतर काही सुनावणीच्या कामकाजाच्या दरम्यान उपस्थित राहिलेला असेल तर अशा अधिकाऱ्याला या निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान कुठलेही प्रकारे अभिवादन करण्याची आवश्यकता नाही अशा प्रकारच्या या जीआरच्या माध्यमातून सूचना देण्यात आलेले आहेत.
अशा प्रसंगी या संबंधित अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी बरोबर कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता कायदा आणि नियमानुसार एका सर्व सामान्य नागरिकाप्रमाणे या लोकप्रतिनिधींना वागणूक द्यावी अशा प्रकारचे निर्देश या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत.
GR PDF