NFSM 3 Month Ration राशन वाटपाबाबत केंद्र शासनाचा मोठा निर्णय

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अंतर्गत राशन कार्ड धारकांना 3 महिन्याचे राशन मिळणार एकत्र

NFSM 3 Month Ration 

रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! ८ एप्रिलपासून मिळणार ३ महिन्यांचे धान्य एकाच वेळी!

केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या (NFSA) लाभार्थ्यांना ३ महिन्यांच्या शिधावाटपाचे  वितरण एप्रिल-जून २०२६ हे एक-वेळ वितरण करण्याची योजना आखली आहे.

केंद्र शासनाच्या माध्यमातून नऊ मार्च 2026 रोजी देण्यात आलेल्या सूचनेच्या अनुषंगाने राज्यामध्ये 10 मार्च 2026 रोजी सर्व जिल्हा कार्यालयांना या तीन महिन्याच्या एकत्रित रेशन वाटपासाठी कळवण्यात आलेले आहे.



राज्यात 17 ते 24 मार्च या कालावधीमध्ये सर्व जिल्ह्यांना अन्नधान्य उचल आणि वितरण बाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्यात आले आहेत याचबरोबर सहा आणि सात एप्रिल रोजी सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील या धान्य वाटपाचे प्रगतीची समीक्षा घेण्यात आलेली आहे. 

राज्यात मार्च महिन्याचं प्रलंबित असलेलं अन्नधान्याचा वितरण हे 7 एप्रिल पर्यंत पूर्ण करण्यात आलेला आहे आणि आता 8 एप्रिल 2026 पासून राज्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना या तीन महिन्याचं एकत्रितपणे रेशन वितरित केलं जाणार आहे 30 एप्रिल पर्यंत सर्व जिल्ह्यांनी या वितरणाच्या प्रक्रिया पूर्ण कराव्यात अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कीट मध्ये तांदूळ, गहू आणि इतर वस्तूंचा समावेश आहे.


या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या राशन कार्डधारकांना त्यांचा ३ महिन्यांचा शिधा एकाच वेळी दिला जाणार आहे. यामुळे विशेषतः पावसाळ्याच्या तयारीदरम्यान अन्नसुरक्षा सुनिश्चित करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

NFSA, AAY, PHH या प्रवर्गातील सर्व वैध शिधापत्रिका धारक या लाभासाठी पात्र असणार आहेत.

देशभरात झालेले अन्न धान्याचे उत्पादन, देशभरातील गोदामातील साठा व्यवस्थापन, आणि पावसाळ्यापूर्वी अन्न धान्याची उपलब्धता अशी कारण या वितरणामागे सांगितली जात आहेत.

राशन कार्ड धारकांना या राशन च लाभ घेण्यासाठी आपली KYC, आधार प्रमाणीकरण झालेले असणे आवश्यक आहे.

#RationUpdate #RationDistribution

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

17.56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी याद्या प्रसिद्ध | shetkari Karjmafi yadi

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026