Annasaheb Patil Karj Yojana: अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेत पतसंस्थांचा समावेश होणार

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेत मोठे बदल: आता कर्ज वाटपात पतसंस्थांचा समावेश होणार 

Annasaheb Patil Karj Yojana

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जवाटप प्रक्रियेत पतसंस्थांचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील मराठा समाजातील तरुणांना उद्योग व्यवसायासाठी अर्थसाह्य दिलं जातं या अर्थसाह्याच्या प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी बँकासोबतच सक्षम पतसंस्थांचाही समावेश केला जाणार आहे. 

ग्रामीण भागासोबत पतसंस्थेच्या नाळ जुळलेले असल्यामुळे कर्ज वाटपाच्या प्रक्रियेमध्ये पतसंस्थांचा समावेश झाल्यास मराठा समाजातील युवकांना व्यवसायासाठी तसेच रोजगार निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या अर्थसहाय्य सहज मिळण्यास मदत होणार आहे. 

सहा जुलै 2026 रोजी सहकार राज्यमंत्री डॉक्टर पंकज भुयार यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भातील एक महत्त्वाचे अशी बैठक पार पडली या बैठकीमध्ये महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी पतसंस्थांचे आर्थिक निकष निश्चित करून विस्तृत प्रस्ताव प्राधान्याने सादर करावा अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत. 

महामंडळाच्या या कर्ज वाटपाच्या प्रक्रियेत पतसंस्थांचा समावेश झाल्यास गरजू कर्जदार तरुणांना अधिक चांगले सेवा मिळेल व उद्योग उभारणे सह रोजगार निर्मितीसाठी देखील आवश्यक अर्थसहाय्य अधिक सहज उपलब्ध होणार आहे.


अण्णासाहेब पाटील महामंडळ: नवीन कार्यपद्धती आणि नियम लागू.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ च्या कर्ज योजना ची प्रक्रिया अतिशय किचकट असल्याने लाभार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता परिणामी एजंट सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची दिशाभूल करत होते यामुळे या योजना संदर्भात लाभार्थ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालेला होता.


याच पार्श्वभूमीवरती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व गट कर्ज परतावा योजना या पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत.

वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत बँक मंजुरी स्तरावरती Reject For Incomplete Documents अर्थात अपूर्ण कागदपत्रामुळे रिजेक्ट असलेले जे काही प्रकरण असतील त्यांच्या अपूर्ण कागदपत्रामुळे जर काही प्रकरण असतील तर त्या लाभार्थ्यांना लॉगिन करून ही प्रकरण ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहेत.

कोणत्या कारणास्तव ते रिजेक्ट आहेत हे तपासता येणार आहे आणि आवश्यक ती कागदपत्र सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अपलोड करता येणार आहेत यामुळे आता लाभार्थ्यांना एजंट कडे किंवा कुठलेही कार्यालयामध्ये फेऱ्या मारण्याची आवश्यकता पडणार नाही.

लाभार्थ्यांनी आवश्यक ती कागदपत्र सबमिट केल्यानंतर ही प्रकरणं Scuttany स्तरावरती जातील आणि कागदपत्राची ऑनलाईन पद्धतीने पडताळणी केल्यानंतर महामंडळाच्या माध्यमातून याची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ही प्रकरण सबमिट होतील लाभार्थ्यांनी सबमिट केल्यानंतर संबंधित प्रकरण पुढील तपासाकरता मुख्यालयाकडे पाठवलं जाणार आहे.

पुढील टप्प्यांमध्ये लाभार्थी व्याज परताव्यासाठी क्लेम सादर करत असताना कागदपत्रांमधील त्रुटीमुळे होल्ड स्थितीत असलेली प्रकरण लाभार्थ्यांना त्यांच्या लॉगिन वरती कारणासहित दिसतील.

अशा प्रकरणासाठी लाभार्थ्यांना जी कागदपत्र त्रुटीमध्ये मागण्यात आलेली आहेत अशी कागदपत्र पुढील पंधरा दिवसांमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहेत हे कागदपत्र सादर केल्यानंतर लाभार्थ्यांची ही प्रकरण Hold मधून काढली जातील पुढे तपासणीसाठी पाठवले जातील.

त्रुटी नसलेल्या क्लेम प्रकरणांमध्ये पूर्वीच्या कार्यपद्धतीनुसार व्याज पर्तव्याची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा झाल्यानंतर पुढील उर्वरित क्लेम सादर करण्याचे परवानगी होती मात्र आता सुधारित प्रणालीमुळे लाभार्थ्यांचा क्लेम Send For CAFO या स्तरावरती पोहोचतात पुढील उर्वरित क्लेम सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत राबवल्या जाणारे योजनेअंतर्गत पात्रता प्रमाणपत्र बँक मंजुरी आणि व्याज पर्तव्यासाठी पात्र असलेली काही प्रकरण एकापेक्षा अधिक समान संपर्क क्रमांक बँक तपशील किंवा सादर केलेल्या कागदपत्रामध्ये विसंगती कागदपत्रांमध्ये केलेले खाडकोड यामुळे ब्लॉक करण्यात आलेली आहेत कारण काही प्रकरण बनावट कागदपत्राच्या आधारे एजंट मार्फत केल्याचे प्रकरण उघड तिला आलेली आहेत.

जर एखादा प्रकरण अशा कागदपत्रातील खाडाखोडी किंवा समान नंबर मुळे होल्ड झालेला असेल तर लाभार्थ्यांनी आपला संपर्क क्रमांक अद्यावत करावा बँक तपशिलामध्ये आवश्यक ती दुरुस्ती करावी तसेच कागदपत्रांमध्ये खाडखोड असेल तर मूळ कागदपत्रासह संबंधित अर्ज जिल्हा समन्वयाकडे सादर करावा अशा प्रकारच्या सूचना देखील आता महामंडळाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत लाभार्थ्यांना महामंडळाच्या माध्यमातून आव्हान करण्यात आलेला आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजना या नियमानुसार राबवण्यात येत असून लाभार्थ्यांनी कोणत्याही अफवा वरती विश्वास ठेवू नये आणि अधिकृत वेब प्रणाली द्वारेच अर्ज आणि पुढील सर्व प्रक्रिया पार पाडाव्यात असा आव्हान देखील महामंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे.



#AnnasahebPatilMahamandal #अण्णासाहेब_पाटील_महामंडळ #MarathaReservation #ShetkariYojana #Mahaswayam #BusinessLoanMaharashtra #InterestRefundScheme