महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय; तब्बल २३ वर्षांनंतर नियमित ८ हजार ६६९ पदांच्या आकृतीबंधास मंजुरी.
२.२१ लाख अंगणवाडी पदांना मान्यता!
Anganwadi Bharti 2026
राज्यात महिला व बाल विकास विभागाच्या सुधारित आकृतीबंधास तब्बल 23 वर्षानंतर मंजुरी देण्यात आलेली आहे.
11 मार्च 2026 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा आकृतीबंध मंजूर करण्यास मंजुरी देण्यात आलेली होती आणि याच अनुषंगाने अखेर 10 एप्रिल 2026 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून महिला व बालविकास विभागाच्या सुधारित आकृतीबंधास तब्बल 23 वर्षानंतर मंजुरी देण्यात आलेली आहे.
शासन निर्णय येथे पहा शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
महिला व बाल विकास विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील क्षेत्रिय कार्यालयांचा सुधारीत आकृतीबंध मंजूर
महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून क्षेत्रीय कार्यालयातील सर्व पदांचा आढावा घेऊन मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीने दिलेल्या मान्यतेनुसार महिला व बालविकास विभागातील एकूण 9248 पदांपैकी 744 पदे निरक्षित करण्यात आलेले असून उर्वरित 8504 पदांमध्ये 165 वाढीव पदे मंजूर करण्यात आलेले आहेत.
महिला व बालविकास विभागाच्या या मंजूर करण्यात आलेल्या सुधारित आकृतीबंध मधील 8669 नियमित पदे व याचबरोबर कार्यालयाची कामे पूर्ण करण्यासाठी 2843 बाह्य यंत्रणेद्वारे पदे भरण्यासाठी देखील मंजुरी देण्यात आलेली आहे.
या सुधारित आकृतीबंध मध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील मानधने तत्वावरील अंगणवाडी सेविका एक लाख दहा हजार सहाशे चौसष्ठ व अंगणवाडी मदतनीस एक लाख दहा हजार 664 अशी एकूण दोन लाख 21 हजार 328 पदं देखील मंजूर करण्यात आलेली आहेत.
तब्बल 23 वर्षानंतर घेण्यात आलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय याच्यामुळे सहाजिकच महिला व बालविकास विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
#अंगणवाडीसेविका