कृषी विभागाच्या पुरस्कारासाठी करा ऑनलाईन अर्ज
Krishi Maharashtra Awards
राज्यात शेती क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी रत्न, वसंतराव नाईक कृषी भूषण, जिजामाता कृषी भूषण आणि उद्यान पंडित यांसारखे महत्त्वाचे पुरस्कार अशा पुरस्कारांचा समावेश आहे.
या पुरस्कारासाठी शेतकऱ्यांना सन २०२५ पासून ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
असा करा अर्ज 👇🏻👇🏻
या पुरस्कारांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार आदींचा समावेश आहे.
या पुरस्कारांसाठी प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जात होते. मात्र प्रस्ताव तयार करण्यासाठी लागणारा वेळ व खर्च अधिक लागत असल्याने शेतकरी याकडे पाठ फिरवत होते.
यामुळे आता कृषी विभागाच्या माध्यमातून ही प्रक्रिया स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली विकसित करून ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे.
कृषी विभागाच्या संकेतस्थळावर https://Krishi.maharashtra.gov.in येथे ‘कृषी पुरस्कार’ या टॅबमध्ये उपलब्ध आहे.
या प्रणालीद्वारे प्रस्ताव सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन व अहवाल निर्मिती ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात राबविली जाणार आहे.
सन २०२५ पासून विविध कृषी पुरस्कारांसाठी इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था व गट यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज सादर करण्याचे आवाहन केले असून पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.