आता राणी दुर्गावती’ योजनेतून स्वतंत्र आदिवासी महिला बचत गट || Mahila Bachat Gat

आता ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’ योजनेतून स्वतंत्र आदिवासी महिला बचत गट

Mahila Bachat Gat 

राज्यातील आदिवासी महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’ योजनेतून शंभर टक्के स्वतंत्र आदिवासी महिला बचत गट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री अशोक उईके यांनी दिली.

या योजनेच्या संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत याबाबत माहिती देण्यात आली असून संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.



‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’  योजनेच्या आढावा बैठकीला आदिवासी विकास विभगाचे सचिव विजय वाघमारे, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या व्यवस्थापकीय संचालक नंदिनी आवडे तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) उपसंचालक श्वेता पालवे, राज्य अभियान व्यवस्थापक रामदास धुमाळे आदी अधिकारी उपस्थित होते.

आदिवासी महिलांना उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या आर्थिक-सामाजिक प्रगतीत सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे हा ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

राज्य शासन महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देत विविध योजना राबवत असून या महिला बचत गट निर्मितीच्या उपक्रमामुळे आदिवासी महिलांचे उत्पन्न वाढून त्यांच्या कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल.

यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) आणि महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने बचत गटांची स्थापना व क्षमता विकास प्रक्रिया राबवली जाते, त्याच धर्तीवर आदिवासी विकास विभागामार्फत या योजनेअंतर्गत स्वतंत्र आदिवासी महिला बचत गट स्थापन करण्याची प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश मंत्री उईकें यांनी दिले.

या योजनेंतर्गत आदिवासी महिलांना विविध उद्यमशील उपक्रमांसाठी मदत दिली जाणार आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map