नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई 'गट-ड' भरती; उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर.
IGR Maharashtra Recruitment
नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई 'गट-ड' संवर्गात २८४ उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर. याचबरोबर प्रतिक्षा यादी, निवडीसाठी नकार दिलेल्या उमेदवारांची यादी, अपात्र उमेदवारांची यादी तसेच कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर उमेदवारांची यादी जाहीर.
उमेदवारांना या याद्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या https://igrmaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत.
नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई 'गट-ड' संवर्गात अंतिम निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांचे समुपदेशन करुन नियुक्ती देण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.
उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे बहुउद्देशिय सभागृह, पाचवा मजला, पुणे येथे सोमवार, २ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता हजर रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या https://igrmaharashtra.gov.in/ संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.