कृत्रिम फुलाच्या वापरावर बंदी; लवकरच शासन निर्णय || Artificial flowers Ban

कृत्रिम फुलाच्या वापरावर बंदी संदर्भात लवकरच शासन निर्णय येणार 

Artificial flowers Ban 

सध्या सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कृत्रिम फुले, प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन व विक्री वापरा संदर्भात आमदार विक्रम पाचपुते यांनी एक लक्षवेधी सूचना मांडली.

यावेळी उत्तर देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बायोटिक ग्रेडेबल नसलेले कुठलेही साहित्य वापरून तयार केलेली कृत्रिम फुले वापरण्यावर बंदी आहे. 

या निर्णयाला अधिक स्पष्टता देण्यासाठी शासन निर्णय काढला जाईल. तसेच, अशा कृत्रिम फुलांचा वापर करणारे डेकोरेटर्स आणि अशा फुलांचा वापर करून सजावट करणारे मोठे मॅरेज हॉल्स यांच्यावरील कारवाईचा समावेशही या शासन निर्णयात करण्यात येईल अशी माहिती दिली.

कृत्रिम फुलांमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून, नैसर्गिक फुलाची मागणी घटून पर्यायाने शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे.

यासंदर्भात पर्यावरण विभाग आवश्यक ती पावले उचलून आवश्यक ती कठोर कारवाई करेल. गरज पडल्यास या कारवाईत इतर विभागही सहभागी होतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map