या कलाकारांच्या खात्यात ₹ ५,०००, अर्ज सुरु | Folk artist mandhan yojana

 

या कलाकारांच्या खात्यात ₹ ५,०००, अर्ज सुरु

Folk artist mandhan yojana

प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकारांना  अर्थसाहाय्यासाठी अर्ज सुरु. 

 ‘कोविड- 19’ च्या पार्श्वभूमीवर प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकरांना अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी पात्र कलावंतांनी दहा दिवसांच्या आत म्हणजे ३० जानेवारी २०२२ पूर्वी  संबंधित तहसीलदारांकडे अर्ज करावेत, असे आवाहन नांदेड जिल्हा समाजकल्याण अधिकारी आर एच एडके  यांनी केले आहे.


कोरोना च्या संकटामुळे बाधित झालेल्या राज्यातील शेकडो लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. 
folk artist mandhan
Folk artist mandhan yojana 





या कलाकारांसाठी एक रकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यास मान्यता दिली आहे. 
त्यामुळे जवळपास दीड वर्षापासून आर्थिक संकटात सापडलेल्या या लोककलावंतांना काहीसा आर्थिक आधार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


या संबंधी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
📝 GR  येथे पहा 

👇👇



त्यामुळे त्याचा फायदा शाहिरी, खडीगंमत, संगीतबारी, तमाशा फड, दशावतार, नाटके, झाडीपट्टी, सर्कस, टुरिंग टॉकीज, विधी नाट्य यामधील कलाकारांना होणार आहे. 






राज्यात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात विविध कलापथके कार्यरत आहेत. कोविडमुळे वर्षभरात प्रयोग न झाल्याने त्यांच्यापुढे आर्थि संकट उभे असून शाहिरी, खडीगंमत, संगीतबारी, तमाशा फड पूर्णवेळ, तमाशा फड- हंगामी,दशावतार, नाटक, झाडीपट्टी, विधीनाट्य, सर्कस आणि टुरींग टॉकीज अशा जवळपास 847 संस्थांतील कलाकारांना मदत करण्यात येणार असून यासाठी 6 कोटी रुपये खर्च होणार आहे. याशिवाय राज्यातील कलाकारांचे सर्वेक्षण, कलाकार निवड आणि इतर अनुषंगिक खर्च यासाठी 1 कोटी रुपये खर्च होणार आहे.


महाराष्ट्रात प्रयोगात्मक कलेतील केवळ गुजराण असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कलाकारांना या योजनेचा एकदाच लाभ मिळेल
संबंधित कलावंताचे राज्यात 15 वर्षे वास्तव्य असावे, 
कलेच्या क्षेत्रात 15 वर्षे कार्यरत असावा
वार्षिक उत्पन्न 48 हजारांच्या कमाल मर्यादेत असावे. 

केंद्र सरकार व राज्य शासनाच्या वृद्ध कलाकार मानधन योजनेतून मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकार, इतर वैयक्तिक शासकीय अर्थसाहाय्य योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.

विहीत नमुन्यातील अर्ज, महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्याचा रहिवासी दाखला (स्थानिक स्वराज्य संस्थेचाही दाखला ग्राह्य), 
तहसीलदारांकडून प्राप्त उत्पन्नाचा दाखला, 
कलेच्या क्षेत्रात 15 वर्षे कार्यरत असल्याबाबतचे पुरावे, 
आधारकार्ड व बँक खात्याचा तपशील (बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडावी), शिधापत्रिकेची सत्य प्रत आदी कागदपत्रे अर्जासमवेत जोडावयाची आहेत, 

असेही आवाहन हि प्रशासनाच्या  माध्यमातून करण्यात आले आहे.