Recent Post

Popular Posts

राज्यात या भागात पुन्हा अवकाळीच संकट || Weather Update Maharashtra

राज्यात या भागात पुन्हा अवकाळीच संकट 

Weather Update Maharashtra 2026

राज्यात ऐन रब्बीच्या पिक कापणीचा हंगाम सुरू असतानाच शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा गारपीठीच संकट आलेलं आहे.

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांसह स्वतः चे या गारपीट अवकाळी पावसापासून संरक्षण करावे अस आवाहन कृषी विभागाने केले आहे.


राज्यात १७ मार्च ते २० मार्च दरम्यान पश्चिम विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दुपारनंतर आभाळी वातावरण तयार होऊन मेघ गर्जनेसह, गारपीट पावसाची शक्यता आहे. विशेषत खानदेशात याचा मोठा फटका बसू शकतो.

या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस गारपीट होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी या कालावधीत कापणी केलेली पीक सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावीत व या नुसार शेतीच्या कामाचे नियोजन करावे. हवामान विभागाच्या माध्यमातून १५ मार्च ते १६ मार्च दरम्यान सुधारित अंदाज वर्तविला जाईल याकडे ही लक्ष ठेवावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.