PAHSKY Shetkari Karjmafi - शेतकरी कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्याच्या निधीचे वितरण सुरु
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026
शेतकरी कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्याच्या निधीचे वितरण सुरु
केवायसी केलेल्या 6,36,036 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात .
PAHSKY Shetkari Karjmafi
आज 24.08.2026 सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ या योजनेची उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली.
याच बैठकीदरम्यान कर्जमाफी अंतर्गत पात्र झालेल्या आणि आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज कर्जमाफीची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील 6 लाख 36 हजार 36 पात्र शेतकऱ्यांना 5086 कोटीच्या कर्जमुक्तीचा लाभ थेट ऑनलाइन पद्धतीने वितरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दुसऱ्या टप्प्यात विभागनिहाय लाभ
अमरावती विभाग : १ लाख ४५ हजार ८०८ शेतकऱ्यांना ₹१,२०८ कोटींचा लाभ.
नाशिक विभाग : ८४ हजार ८१३ शेतकऱ्यांना ₹७५६ कोटींचा लाभ.
छत्रपती संभाजीनगर विभाग : ३ लाख २ हजार २७३ शेतकऱ्यांना ₹२,२८४ कोटींचा लाभ.
पुणे विभाग : ४९ हजार २२४ शेतकऱ्यांना ₹४१७ कोटींचा लाभ.
नागपूर विभाग : ४४ हजार ८६४ शेतकऱ्यांना ₹३६६ कोटींचा लाभ.
कोकण विभाग : ९ हजार ५४ शेतकऱ्यांना ₹५४ कोटींचा लाभ.
कर्जमाफी योजनेतील KYC झालेल्या 6.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात होणार कर्जमाफीची रक्कम जमा.
शासन निर्णय 19 ऑगस्ट 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2026 या योजनेअंतर्गत निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबकर्जमुक्तीनंतर तातडीने खरीप पीक कर्ज
कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामातील शेतीकामांसाठी आर्थिक अडचण भासू नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व बँकांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आवश्यक आर्थिक बळ मिळणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या ( PAHSKY Shetkari Karjmafi ) पहिल्या टप्प्यात विभागनिहाय माहिती
- अमरावती विभागात १ लाख ५८ हजार १४६ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात १,३७२.१७ कोटींचा लाभ
- नाशिक विभाग- १ लाख ४० हजार ८९ शेतकऱ्यांना १,२०९.३९ कोटी रुपये
- छत्रपती संभाजीनगर विभाग- १ लाख ३० हजार ९३४ शेतकऱ्यांना ९३२.६१ कोटी रुपये
- पुणे विभाग- १ लाख ४ हजार ६१ शेतकऱ्यांना ८६०.९७ कोटी रुपये
- नागपूर विभाग- ७० हजार २९० शेतकऱ्यांना ५४४.७१ कोटी रुपये
- कोकण विभागातील १८ हजार ६८७ शेतकऱ्यांना १०८.८६ कोटीं रुपयांचा लाभ