सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026
सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू.
Assk registration 2026
Aple sarkar seva kendraAple Sarkar Jahirat Sangli |
जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली यांच्यामार्फत शहरी व ग्रामीण भागासाठी एकूण ८९४ जागांसाठी ASSK केंद्र वाटपाची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे!
बीड जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील रिक्त असलेल्या 677 जागांकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत.
Beed Jahirat PDF
New Aaple Sarkar Seva Kendra (Urban Sector) Date 07/09/2026 to 30/09/2026
New Aaple Sarkar Seva Kendra Extension (Rural Sector) Date 07/09/2026 to 11/09/2026
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील रिक्त असलेल्या 592 जागा करता अर्ज मागविण्यात आलेले आहेत अर्जदारांना 1 सप्टेंबर 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहेत.
हा अर्ज दाखल करण्यासाठी सेतू संकलन महसूल शाखा पहिला मजला जिल्हाधिकारी कार्यालय शासकीय दूध डेअरी जवळ सात रस्ता परिसर सोलापूर या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत दाखल करावा लागणार आहे.
सोलापूर जाहिरात
Aaple Sarkar Seva Kendra-Application Form, Self-Declaration Form, Annexure A & B
Aaple Sarkar Seva Kendra Announcement, List of Vacant Centers, and Terms & Conditions
लातूर जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ६४० आपले सरकार सेवा केंद्र करिता ओंलीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
यामध्ये ग्रामीण भागातील ५९९ नगरपरिषद ८ नगर पंचायत २ तर महानगरपालिका क्षेत्रात ३१ रिक्त जागा आहेत. या जागांकरिता २५ ऑगस्ट २०२६ ते १५ सप्टेंबर २०२६ या काळात ओंलीने पध्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
जाहिरात येथे पहा जाहिरात
ASSK Latur Application Link https://setusamitilatur.in/index.php
नवीन आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात – 2026 Buldhana
पुणे जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 1400 आपले सरकार सेवा केंद्र जागा करता अर्ज मागवण्यात आलेले आहेत. 9 जुलै 2026 च्या नवीन शासन निर्णयानुसार लावण्यात आलेल्या अटी शर्ती पात्रतेच्या आधारे उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत.
इच्छुक उमेदवारांना 13 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये हे अर्ज करता येणार आहेत.
पुणे जिल्हा जाहिरात 👇🏻
नवीन आपले सरकार सेवा केंद्र – जाहीरनामा
नवीन आपले सरकार सेवा केंद्र – रिक्त केंद्रांची यादी अ. क्र. १ ते ७४२
नवीन आपले सरकार सेवा केंद्र – रिक्त केंद्रांची यादी अ. क्र. ७४३ ते १४००
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील रिक्त असलेल्या ग्रामीण भागातील 665 व शहरी भागातील 185 अशा एकूण 850 जागांकरिता आपले सरकार सेवा केंद्र करिता अर्ज मागविण्यात आलेले आहेत 17 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर जाहिरात.
New Aaple Sarkar Seva Kendra Advertisement-2026 Collector Office, Chhatrapati Sambhajinagar
जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव मार्फत नवीन आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात 2026
Advertisement for New ‘Aaple Sarkar’ Service Centers by the Dharashiv District Collector’s Officeपरभणी जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 471 आपले सरकार सेवा केंद्र करता ऑनलाईन पद्धतीने अर्ज आमंत्रित.
जालना जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये रिक्त असलेल्या तशाच नव्याने स्थापन करण्यात आलेल्या 735 आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
जालना जिल्ह्यातील रिक्त असलेल्या या 735 जागांकरिता 6 ऑगस्ट 2026 ते 20 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्यासाठी ऑनलाइन संकेतस्थळ खाली दिले आहे.
ASSK registration portal Jalana - https://asskjalna.recruitonline.in/
जालना जिल्हा आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात खालील लिंक वरती पहा.
आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात जळगाव
जळगाव जिल्ह्यातील रिक्त असलेल्या आणि नव्याने स्थापन करण्यात आलेल्या 782 गावांमध्ये 1053 जागांसाठी आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र करता इच्छुक उमेदवारांना 10 ऑगस्ट 2026 पासून 31 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. आपले सरकार सेवा केंद्र करता राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेल्या नवीन अटी शर्ती पात्रतेच्या अधीन राहून जे उमेदवार या पदांकरिता अर्ज करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी 31 ऑगस्ट 2026 पर्यंत आपल्या तहसील कार्यालयामध्ये अर्ज सादर करावे.
Aaple Sarkar Seva Kendra Advertisement – 2026
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रिक्त असलेल्या 633 आपले सरकार सेवा केंद्र करता अर्ज मागवण्यात आलेले असून पात्र उमेदवारांना 29 जुलै 2026 ते 14 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलेला आहे.
चंद्रपूर जिल्ह्याची जाहिरात येथे पहा PDF
सातारा जिल्ह्यात नवीन 'आपले सरकार सेवा केंद्र' सुरू करण्यासाठी इच्छुक व्यक्ती आणि महाविद्यालयांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्याची प्रक्रिया ५ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सुरू राहणार असून, जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत, नगरपंचायत आणि नगरपरिषदनिहाय रिक्त जागांची यादी, अर्जाचा नमुना तसेच अटी व शर्ती आणि आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्जाचा नमुना सातारा जिल्ह्याचे https:/www.satara.gov in या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय यांच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध करून दिल्या आहेत.
राज्य शासनाच्या विविध शासन निर्णयांनुसार आपले सरकार सेवा केंद्रांचे वितरण अधिक पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी सुधारित निवड प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. त्यानुसार आता गुणांकन पद्धती, किमान पात्रता, आवश्यक पायाभूत सुविधा, मुलाखत, कार्यप्रदर्शनावर आधारित कराराचे नूतनीकरण तसेच अपात्रतेचे निकष यांचा विचार करून सेवा केंद्रांचे वाटप करण्यात येणार आहे.
राज्यातील ज्या महाविद्यालयांकडून आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याची मागणी केली जाईल, त्या महाविद्यालयांनाही शासनाच्या तरतुदीनुसार केंद्र मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पूर्णपणे भरून, आवश्यक कागदपत्रांसह आपल्या गावाचा समावेश ज्या महसुली उपविभागात होतो त्या उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयात जमा करावा.
ADV Link
‘Aaple Sarkar Seva Kendra’ notification, terms and conditions, application form template, and list of vacancies for ‘Aaple Sarkar Seva Kendras’
आपले सरकार सेवा केंद्र वाटपाची संपूर्ण प्रक्रिया होणार ऑनलाईन प्रणालीद्वारे
राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स कृती कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण व शहरी भागात नागरीकांपर्यंत शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवा पोहोचविण्यासाठी तसेच सदर सेवेकरीता नागरिकांचा वेळ व श्रम वाचविण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे.
वर्धा जिल्ह्यामध्ये रिक्त असलेल्या ग्रामीण तसेच नगरपरिषद नगरपंचायत याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रातील 222 आपले सरकार सेवा केंद्र करता अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत: १२ ऑगस्ट (रात्री १२:०० वाजेपर्यंत) अर्ज सादर करता येतील, ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
आपले सेवा केंद्र सुरु करणाऱ्या इच्छुकांनी aaplesarkarwardha.gt.tc या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने 29 july to 12 august पर्यंत अर्ज करावेत.
आपले सरकार सेवा केंद्राबाबत अटी व शर्ती तसेच रिक्त असलेल्या केंद्राची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
वर्धा जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्राकरिता सन २०२६ या वर्षाकरिता रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्राची यादीस अनुसरून ऑनलाईन अर्ज सादर करणेसाठी लिंक ,जाहिरात ,अटी व शर्ती.
GadChiroli Update
गडचिरोली जिल्ह्यात अनुज्ञेय असलेल्या ११४ ग्रामपंचायत स्तरावरील तसेच २ नगर परिषद/नगर पंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे इच्छुक अर्जदारांना १० जुलै २०२६ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सेतू शाखेत १० जुलैपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
आपले सरकार सेवा केंद्र वाटपाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन प्रणालीव्दारे केली जाणार असून, अर्जदारांनी ऑनलाईन दाखल केलेल्या कागपत्रांचे आधारे शासन निर्णयानुसार पुढीलप्रमाणे गुणांकन करण्यात येईल.
कोणत्याही शाखेचा पदवीधर असल्यास ३० गुण, कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर असल्यास २५ गुण, सीएससी केंद्र असल्यास २५ गुण याप्रमाणे गुणांकन राहील.
https://cdn.s3waas.gov.in/s345fbc6d3e05ebd93369ce542e8f2322d/uploads/2026/06/17818557082595.pdf
आपले सरकार सेवा केंद्र साठी आवश्यक कागदपत्रांची यादी -
- पासपोर्ट साईज फोटो
- इयत्ता 12 वी उत्तीर्ण असलेबाबत गुणपत्रक/प्रमाणपत्र
- आधार कार्ड प्रत
- पॅन कार्ड प्रत
- पदवी, पदव्युत्तर उत्तीर्ण असल्यास गुणपत्रक/प्रमाणपत्र (केवळ उत्तीर्ण असल्यास नमुद करावे. पदवी/पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश असल्यास नमुद करु नये)
- Common Service Centre ID Certificate
- ज्या भौगोलिक क्षेत्रासाठी अर्ज करावयाचा आहे, त्या भौगोलिक क्षेत्रात रहिवास असलेबाबतचा पुरावा (आधार कार्ड व्यतिरिक्त खालीलपैकी एक पुरावा जोडावा)
- ग्रामपंचायतीचा दाखला
- तहसिलदार रहिवास प्रमाणपत्र
- मतदार ओळख पत्र
- शिधापत्रिका
- ग्रामपंचायत/नगरपंचायत/नगरपरिषद महानगरपालिका मालमत्ता पत्रक
- संगणक अर्हता (MS-CIT / CCC) असल्यास प्रमाणपत्र
मुलाखत प्रक्रिया :
एका गावासाठी एकापेक्षा जास्त अर्जदार असतील आणि त्यांचे गुण समान असतील तरच मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीसाठी २० गुण निश्चित आहेत. मुलाखतीच्या गुणांची विभागणी खालील प्रमाणे करण्यात येईल.
तांत्रीक ज्ञान असल्यास 06 गुण, लोकसेवा हक्क अधिनियम 2025 चे ज्ञान असल्यास 04 गुण, सामान्य ज्ञान व व्यक्तिमत्व, सामाजिक क्षेत्रात राबविलेले उपक्रम अथवा सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा अनुभव असल्यास- 10 गुण
महाराष्ट्र शासनाच्य माहिती व तंत्रज्ञान विभाग व सामन्य प्रशासन विभागाच्या वतीने शासन निर्णयाअन्वये केंद्रशासनाच्या राष्ट्रीय ई- गव्हर्नन्स कृती कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण व शहरी भागात नागरिकापर्यंत शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवा पोहचविण्यासाठी शासनाच्या वतीने आपले सरकार सेवा केंद्रे हे प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात नगरपंचायत कार्यक्षेत्रात नगर परिषद कार्यक्षेत्रात व तसेच महानगर पालिका कार्यक्षेत्रात आपले सरकार सेवा केंद्रे स्थापीत करणे बाबतचा उक्त शासन निर्णयाव्दारे निर्णय घेण्यात आलेला आहे.
आपले सरकार सेवा केंद्रासाठी अटी व शर्ती पूढील प्रमाणे आहेत.- आपले सरकार सेवा केंद्रामार्फत महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 19 जानेवारी 2018 मधील परीशिष्ट क मध्ये नमुद केलेल्या सर्व सेवा नागरीकांना देणे आवश्यक आहे. या शासन निर्णयातील परीशिष्ट ड मध्ये नमुद केलेल्या विहीत नमुन्याप्रमाणे आपले सरकार सेवाकेद्राचा बोर्ड / फलक लावणे आवश्यक आहे.
आपले सरकार सेवा केंद्र मंजूर ठिकाणीच चालविण्यात यावे अन्यथा इतर ठिकाणी आढळून आल्यास त्यांचेवर कार्यवाही करण्यात येईल. नागरीकांकडून स्वकारण्यात येणाऱ्या पेमेंटसाठी ई-सुविधा उपलब्ध् करुन दयाव्यात, डिजिटल पेमेंटला प्राधान्य देणे. शासनाने ठरवुन दिलेल्या वेळापत्रकानुसार आपले सरकार सेवा केद्र चालु ठेवुन नागरीकांना सेवा पुरविणे.
शासनाने ठरवून दिलेल्या कॉमन ब्रॅडींगचा वापर करणे तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाने स्थापन केलेल्या हेल्पलाईन क्रमांकाचा तपशील आपले सरकार सेवा केंद्राच्या दर्शनी भागावर प्रसिध्द करणे.
शासनाने ठरवून दिलेले दर केंद्राच्या दर्शनी भागावर प्रसिध्द करणे तसेच ठरवुन दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकारणी न करणे.
शासनाने पुरविलेल्या वस्तू आज्ञावली इ. चे वापर संरक्षण जतन करणे. सर्व ग्राहकांना सौजन्याची वागणुक देणे आणि आवश्यक मदत व सहकार्य करणे.
विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत ठरवुन दिलेले वेळापत्रक व निर्देश काटेकारेपणे पाळणे.
ज्या अर्जदारांकडे CSC ID नाहीत अशा अर्जदारांनी CSC ID काढणे आवश्यक आहे.
आपले सरकार सेवा केद्र स्थापन करण्यासाठी संबंधित गावातील इच्छुक अर्जदाराने विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास करु शकतात.