पोस्ट्स

Karjmafi लेबलसह पोस्ट दाखवत आहे

PAHSKY Shetkari Karjmafi - शेतकरी कर्जमाफीच्या 3ऱ्या टप्याच्या निधीचे वितरण सुरु

इमेज
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 शेतकरी कर्जमाफीच्या 3ऱ्या टप्याच्या निधीचे वितरण सुरु केवायसी केलेल्या 3,27,250 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात .  PAHSKY Shetkari Karjmafi  आज 01.10.2026 सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ या योजनेची उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. याच बैठकीदरम्यान कर्जमाफी अंतर्गत पात्र झालेल्या आणि आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज कर्जमाफीची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ अंतर्गत राज्यातील 3,27,250 पात्र शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्यातील ₹3160.43 कोटींच्या लाभाचा हप्ता वितरित करण्यात आला. आतापर्यंत या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 15,85,493 पात्र शेतकऱ्यांना ₹13,275 कोटींचे वितरण क...

अशी होणार शेतकरी कर्जमाफीची KYC; नव्या सूचना जाहीर | Shetkari Karjmafi KYC

इमेज
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ कर्जमाफीत पात्र शेतकऱ्यांची KYC आधार प्रमाणीकरण आता फक्त बायोमेट्रिक पद्धतीनेच; सहकार आयुक्तालयाचे निर्देश Shetkari Karjmafi KYC राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणण्यात आलेली आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी राबवल्या जाणाऱ्या या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण व ॲग्रीस्टॅक, आधार नोंदणीची प्रक्रिया अधिक प्रभावी व सुरक्षित करण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची सुधारित पद्धत लागू करण्यात आली आहे. या नवीन सुधारित कार्यपद्धतीबद्दल सहकार विभागाचे अपर आयुक्त व विशेष निबंधक (सहकारी संस्था) नागनाथ यगलेवाड यांनी सर्व संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवण्यासाठी काढण्यात आलेल्या 02 जून 2026 च्या जीआर नुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे तसेच ॲग्रीस्टॅक आधार नोंदणी अनिवार्य आहे.  त्यानुसार, योजनेच्या संगणकीय प्रणालीवर कर्ज खात्...

शेतकरी कर्जमाफी GR आला; कोण पात्र कोण अपात्र | प्रोत्साहन अनुदान कोणाला | Shetkari Karjmafi GR 2026

इमेज
शेतकरी कर्जमाफी GR आला; कोण पात्र कोण अपात्र, प्रोत्साहन अनुदान कोणाला? Shetkari Karjmafi GR 2026 Punyashlok ahilyadevi holkar Karjmukti yojana 2026 राज्यातील शेतकऱ्यांची गेल्या २ वर्षाची शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा संपली; अखेर २ जून २०२६ रोजी राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली. राज्यात शेतकरी कर्जमाफी साठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ही योजना राबवली जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्जमाफ, दोनलाखावरील कर्जासाठी ‘वन टाईम सेटलमेंट’ आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान असे तीन घटक असणार आहेत. या ३ घटकात ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ होणार आहे यामुळे शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होणार आहेत.  याचबरोबर ज्यांचे कर्ज दोन लाखांपेक्षा अधिक आहे, त्या शेतकर्‍यांना दोन लाखांवरील थकबाकी 31 मार्च 2027 पूर्वी भरल्यास त्यांच्या खात्यातही दोन लाख रुपये शासन जमा करणार आहे.  तर नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्...

या बँकेच्या कर्जदारांना मोठा दिलासा; एकरक्कमी कर्ज परतफेड योजना सुरू | Society Pik Karj OTS 2026

इमेज
या बँकेच्या कर्जदारांना मोठा दिलासा; एकरक्कमी कर्ज परतफेड योजना सुरू Society Pik Karj OTS 2026 राज्यातील थकीत कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे कारण राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असताना सहकार मंत्री यांच्या माध्यमातून मात्र राज्यामध्ये प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था यांच्यासाठी एक रकमी कर्ज परतफेड योजना राबवायला मंजुरी दिली आहे. GR 02.07.2026 PDF नागरी सहकारी बँकांना एकरकमी कर्ज परतफेड योजना लागू करण्याबाबत. GR 29.06.2026 PDF नागरी सहकारी पतसंस्थांना लागू करण्यात आलेल्या सुधारीत सामोपचार परतफेड   योजना या योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचे बैठक मंत्रालयात पार पडली राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती.  राज्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था यांच्याकडे थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जासाठी एक रकमे कर्ज परतफेड योजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.  या योजनेअंतर्गत 30 जून 2023 अखेर पर्यंत ची थकीत पीक कर्ज तसेच मध्यम व दीर्घ मुदत...

शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी आधार प्रमाणीकरण, ऍग्रिस्टॅक नोंदणी बंधनकारक | Shetkari Karjmafi Documents

इमेज
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी शेतकऱ्यांना आधार प्रामाणिकरण व ऍग्रिस्टॅक नोंदणी बंधनकारक  Shetkari Karjmafi Documents राज्यातील थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऍग्री स्टॅगची नोंदणी आणि आधार चालू मोबाईल नंबरशी संलग्न करणे बंधनकारक करण्यात आलेला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी नैसर्गिक आपत्ती दुष्काळ आणि अतिवृष्टी इत्यादी कारणामुळे आपल्या पीक कर्जाची परतफेड करू शकले नाहीत, अशी कर्जाची परतफेड न करू शकलेल्या शेतकऱ्या ना नवीन कर्ज उपलब्ध होत नाहीत. या शेतकऱ्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी एक एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये कर्ज घेतलेल्या आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या अल्पमुदत पीक कर्जदार शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे. योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना प्रति शेतकरी कमाल २ लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. यापूर्वीच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेत...

अखेर शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर; नियमित कर्जदारांना ५०,००० अनुदान Shetkari Karjmafi Yojana 2026

इमेज
शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर; नियमित कर्जदारांना ५०,००० प्रोत्साहनपर अनुदान Shetkari Karjmafi Yojana 2026 punyashlok Ahilyadevi holkar shetkari karjmukti yojana 2026 राज्याच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. GR 02.06.2026 PDF Link 👇🏻  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2026 शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते त्याकरिता समिती गठीत केलेली आहे. राज्यातील 30 सप्टेंबर पर्यंत पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपये पर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे. याचबरोबर जे शेतकरी आपल्या पीककर्जाची नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये पर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्जमाफी तसेच प्रोत्साहन पर लाभ देण्याबरोबरच राज्या...

अन्यथा हे शेतकरी राहणार कर्जमाफी पासून वंचित || Shetkari Karjmafi 2026

इमेज
थकीत कर्जदार शेतकऱ्यांचे आधार अपडेट प्रलंबित;कर्जमाफीच्या लाभासाठी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन Shetkari Karjmafi 2026 राज्यात खरीप हंगाम 2025 मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्ती च्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून शेती क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी प्रस्तावित कर्ज निवारण योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात थकीत कर्जदार शेतकरी सभासदांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्यापही विविध जिल्ह्यातील हजारो शेतकरी सभासदांचे आधार क्रमांक प्राप्त झाले नसल्याने त्यांच्या कर्जमाफीच्या प्रक्रियेत तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे. शासनाच्या प्रस्तावित कर्जमाफी पोर्टलवर राज्यातील लाखो शेतकऱ्यांची खाती नोंदवण्यात आली आहेत. यात प्राथमिक कृषी पत पुरवठा सेवा सहकारी संस्थांचे थकीत कर्जदार आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा स्तरावरील कर्जदार अशा कर्जदार सभासदांची आधार कार्ड माहिती अद्याप अप्राप्त आहे विहित नमुना प्रपत्र 'अ' व 'ब' मध्ये ही माहिती भरण्याचे काम सध्या सेवा सहकारी संस्था आणि...

शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रस्तावित; कागदपत्र सादर करण्याचे आवाहन Shetkari Karjmafi

इमेज
शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रस्तावित; कागदपत्र सादर करण्याचे आवाहन. Shetkari Karjmafi  शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण योजना प्रस्तावित; माहिती संकलनाचे काम सुरू, थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावी प्रशासनाचे आवाहन. राज्यात राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडवून अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येत असून, त्याच अनुषंगाने प्रस्तावित शेतकरी कर्जमाफी योजनेसंदर्भात माहिती संकलनाचे काम सुरू आहे. थकीत कर्जदार सभासदांची माहिती संकलित करुन विहीत नमुना प्रपत्र अ व ब मध्ये तयार करण्याचे काम संबंधित प्राथमिक कृषी पतपुरवठा सेवा सहकारी संस्था, तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा स्तरावर सुरु आहे. राज्यातील विविध सेवा सहकारी संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे थकीत कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांनी अद्याप आपली आवश्यक कागदपत्रे बँकेकडे जमा केलेली नाहीत. यामुळे या योजनेसाठी माहिती गोळा करण्यात विलंब होत आहे. शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, फार्मर आयडी व इतर आवश्यक माहिती सचिव किंवा वसुली अधिकाऱ्यांकडे द्यायवी, असे आवाहन करण्यात आले आहे. अ...

या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ; बोजा कमी करण्याचे आदेश || Shetkari karjmafi

इमेज
भूविकास बँकेच्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ; बोजा कमी करण्याचे आदेश Shetkari Karjmafi 2026 नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5 हजार 106 कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ   नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या एकुण 5 हजार 106 शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी. 5106 कर्जदार शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावरील भू-विकास बँकेच्या कर्ज बोजाची नोंद कमी करण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आदेश. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी 2 फेब्रुवारी रोजी एक परिपत्रक काढून जिल्हयातील संबंधित सर्व तहसिलदार यांना तालुक्यातील एकुण 5 हजार 106 थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी देऊन सदर शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावरील भूविकास बँकेच्या (भु-तारण बँक, भूविकास बँक व महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक मर्या. मुंबई) कर्जबोजाची नोंद कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व तालुक्याचे तहसीलदार यांना यासाठी सर्व तालुका, मंडळस्तरावर कॅम्प आयोजित करून व कर्ज बोजाची नोंद कमी केल्याचे प्रमाणपत्र निर्गमीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  नांदेड जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय बँ...

५०,००० प्रोत्साहनपर अनुदानासाठी kyc करण्याचे आवाहन #regularkarjmafi

इमेज
 ५०,००० प्रोत्साहनपर अनुदानासाठी kyc करण्याचे आवाहन regular karjmafi  पात्र ठरलेल्या ३३ हजार ३५६ कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन मुंबई, दि. 9 : सहकार विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण झालेल्या 14 लाख 38 हजार खातेदारांना 5216 कोटी 75 लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरीत करण्यात आला आहे. मात्र, या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या 33 हजार 356 कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही. अशा पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे. संबंधित बॅंकांनीही खातेदारांना याबाबत कळवावे, असे निर्देशही सहकार विभागाने दिले आहेत. पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सहकार विभागाच्या दिनांक 29 जुलै 2022 रोजीच्या शासननिर...