PAHSKY Shetkari Karjmafi - शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या टप्याच्या निधीचे वितरण सुरु
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या टप्याच्या निधीचे वितरण सुरु केवायसी केलेल्या 6.22 लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात . PAHSKY Shetkari Karjmafi आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ या योजनेची उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. याच बैठकीदरम्यान कर्जमाफी अंतर्गत पात्र झालेल्या आणि आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज कर्जमाफीची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आज 7 ऑगस्ट 2026 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील कर्जमाफी योजनेअंतर्गत केवायसी केलेल्या 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,029 कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीच्या लाभाचा वितरण करण्यात आले. योजनेच्या पहिल्या यादीत समाविष्ट असलेल्या मात्र अद्याप आधार प्रमाणीकरण पूर्ण न केलेल्या पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण तातडीने पू...