17.56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी याद्या प्रसिद्ध | shetkari Karjmafi yadi
17.56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी याद्या प्रसिद्ध
Shetkari Karjmafi yadi
राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या 25 जुलै 2026 पर्यंत तीन याद्या प्रकाशित करण्यात आले आहेत. या तीन याद्याच्या माध्यमातून राज्यातील 17 लाख 48 हजार 796 शेतकऱ्यांना आतापर्यंत पात्र करून केवायसी करण्यासाठी पोर्टल वरती VK नंबर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे बधनकारक आहे आणि यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र मध्ये आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यातील ३७८६५ शेतकऱ्यांची यादी पोर्टल वर अपलोड करण्यात आली आहे यात शिराळा 1425, सांगली 17, वाळवा 3481, मिरज 5403, आटपाडी 1725, कवठेमहांकाळ 2872, विटा 1617, पलूस 2516, कडेगाव 1795, तासगाव 5496, जत 11 हजार 518 शेतकऱ्यांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यामधील १३०५ गावामधील कर्जमाफी योजनेत पात्र झालेल्या ९७२९२ शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 5278 शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आतापर्यंत आलेल्या या यादीनुसार मंडनगड तालुक्यातील 333, दापोली तालुक्यातील 560, खेड तालुक्यातील 491, चिपळूण तालुक्यातील 785, गुहागर तालुक्यातील 565, संगमेश्वर तालुक्यातील 752, रत्नागिरी तालुक्यातील 356, लांजा तालुक्यामधील 800, राजापूर तालुक्यामधील 636 शेतकऱ्यांची अशी एकूण रत्नागिरी जिल्ह्यातील ५२७८ शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी जाहीर करण्यात आलेली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील एकूण पात्र लाभार्थी ५२,८८१ एवढी असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक २९,८५६, राष्ट्रीयकृत/ग्रामीण/खाजगी बँका २३,०२५ इतकी आहे. यात वाशिम१४,१६५, रिसोड ११,८७९, कारंजा ७,४१४, मानोरा ७,४७४, मंगरुळपीर ६,३०२, मालेगाव ५,६४७ इतके लाभार्थी पात्र झाले आहेत.
या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पात्र झालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील 2539 शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली असून पहिल्या टप्प्यातील 2539 शेतकऱ्यांना 11 कोटी 74 लाख 66 हजार रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण जिल्ह्या मध्यवर्ती सहकारी बँकेने 2926 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याची माहिती अपलोड केलेली आहे त्यापैकी 2539 शेतकरी या पहिल्या टप्प्यांमध्ये पात्र झालेले आहेत.
यामध्ये नांदेड जिल्ह्यातील १५८२ गावांमधील एकूण ९६ हजार ९२० पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. नांदेड तालुका ६५८२ शेतकरी, अर्धापूर तालुका २४७९ शेतकरी, मुदखेड तालुका ३९२५ शेतकरी, हदगाव तालुका ६८३९ शेतकरी, किनवट तालुका ९०५९ शेतकरी, माहूर तालुका २४८१ शेतकरी, हिमायतनगर तालुका ३९१९ शेतकरी, भोकर तालुका ५९९७ शेतकरी, उमरी तालुका ४२६० शेतकरी, धर्माबाद तालुका ४१२६ शेतकरी, बिलोली तालुका ६१७० शेतकरी, नायगाव तालुका ७२७५ शेतकरी, देगलूर तालुका ८५१२ शेतकरी, मुखेड तालुका ७८८६ शेतकरी, कंधार तालुका ७३५४ शेतकरी, लोहा तालुका १००५६ शेतकरी याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 12,107 पात्र शेतकऱ्यांची नावे आतापर्यंत यादीत आलेली आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १,२७६ गावांमधील एकूण ९९ हजार ६४८ पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 6711 शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरले आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील 46 हजार 46 पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. तर वर्धा जिल्ह्यातील ६०००० शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत सातारा जिल्ह्यातील ५४३०१ शेतकऱ्यांची माहिती संग्रहित केलेली असून आत्तापर्यंत प्रकाशित करण्यात आलेल्या याद्यामधून 53 हजार 736 शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील ५३ हजार ८९६ पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील 673 गावांमधील 44 हजार 177 शेतकऱ्यांची आतापर्यंत यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये हिंगोली तालुक्यातील 142 गावांतील 12,118 लाभार्थी, वसमत तालुक्यातील 136 गावांतील 6,441, कळमनुरी तालुक्यातील 144 गावांतील 9,992, सेनगाव तालुक्यातील 130 गावांतील 7,348 आणि औंढा नागनाथ तालुक्यातील 121 गावांतील 8,278 लाभार्थींचा समावेश असून, एकूण 673 गावांतील 44,177 पात्र शेतकरी या यादीत समाविष्ट आहेत.
याचप्रमाणे लातूर जिल्ह्यातील ५४४२६ पात्र शेतकऱ्यांची आतापर्यंत यादी प्रकाशित करण्यात आलेले आहे तर जालना जिल्ह्यातील 954 गावातील 100075 पात्र शेतकऱ्यांच्या याद्या आतापर्यंत प्रकाशित करण्यात आलेले आहेत. यात जालना 16790, बदनापुर 9055, अंबड 16372, घनसावंगी 12882, परतुर 10091, मंठा 6869, जाफ्राबाद 13230, भोकरदन 14786 अशी तालुकानिहाय संख्या आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी 24 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 675 गावांमधील 3 हजार 444 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला. नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पोर्टलवर 4 हजार 840 पात्र शेतकऱ्यांचा डाटा अपलोड केला होता. त्यापैकी 3 हजार 444 शेतकऱ्यांची पहिली यादी संबंधित गावातील गाव चावडी, ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सेवा संस्था (VKS) आणि बँक शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५१,७३८ लाभार्थी शेतक-यांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. ही यादी ग्रामपंचायत, गावचावडी, सहाय्यक निबंधक / सहकार अधिकारी श्रेणी-१ तालुका ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था, बँका यांचे कार्यालयात, शेतक-यांना पाहण्यासाठी उपलब्ध असुन योजनेस सर्व पात्र शेतक-यांनी त्यांचे नाव यादीमध्ये असल्याची खात्री करुन नावासमोरील विशिष्ठ क्रमांक, बँकेचे पासबुक, आधार कार्ड, आधार कार्डशी संलग्न मोबाईल यासह जवळचे सेतु सुविधा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करावे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा बँकेच्या सुमारे १ लाख १६ हजार ५१२ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत अकोला जिल्ह्यातील ५३,८९६ पात्र शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या शेतकरी कर्जमाफी योजना अंतर्गत धुळे जिल्ह्यातील ३५१७ पात्र शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील १०,४६७ पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली असून अमरावती जिल्ह्यातील ७१६५५ शेतकऱ्यांच्या या यादीत समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील सुमारे ३८,१२५ पात्र शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली असून चंद्रपूर जिल्ह्यातील ३६७५७ शेतकरी या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत तब्बल 68 हजार 859 शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यामध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील जवळजवळ 29409 कर्ज खात्याची माहिती आतापर्यंत पोर्टल वरती अपलोड केली असून 241 खात्याची माहिती अपलोड करणे बाकी आहे. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग यांच्या २५ जून २०२६ रोजीच्या प्रगती अहवालानुसार, उर्वरित २४१ खात्यांपैकी एक हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेली खाती, आधार नसलेले लाभार्थी, मयत सभासद खातेदार तसेच दुबार पीक कर्जाची प्रकरणे यांचा समावेश असून अशा प्रकरणांची पडताळणी आणि आवश्यक कार्यवाही सुरू आहे.
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील ६१ हजार ९०० पात्र शेतकऱ्यांना ५२३ कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार.
परभणी जिल्हयात एकूण 1 लाख 60 हजार 769 शेतकरी सभासदांपैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. परभणी 2 हजार 985 व राष्ट्रीयकृत बँकेचे 1 लाख 57 हजार 784 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केलेली आहे. पहिल्या यादीतील 79 हजार 855 शेतकऱ्यांना एकूण रक्कम 582 कोटी रूपयांचा लाभ मिळणार आहे.
अक्कलकोट – १२६, बार्शी – १२३, करमाळा – १२०, माढा - ११४, माळशिरस - १०६, पंढरपूर -९७, मोहोळ – ९४, दक्षिण सोलापूर – ८७, सांगोला – ८२, मंगळवेढा – ७६ आणि उत्तर सोलापूर – ५२ शेतकऱ्यांचा समावेश
राज्यात शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपात्र शेतकऱ्यांचे याद्या प्रकाशित करण्यासह या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.
GR Link 👇🏻 👇🏻
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2026 या योजनेच्या अंमलबजावणीकरीता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित
याचबरोबर थकबाकी कर्जाची रक्कम दोन लाखापेक्षा जास्त असेल तर त्या शेतकऱ्यांना ओटीएस योजनेअंतर्गत कर्जमाफी दिली जाणार आहे या सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 11 जून 2026 च्या जीआर नुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आलेली आहे.
या समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे सदस्य असतील मुख्य कार्यकारी अधिकारी मध्यवर्ती सहकारी बँक, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा समन्वय व्यापारी बँका हे सदस्य असतील तर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ही या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.
या समितीच्या माध्यमातून महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती यांचे सदस्य पदाधिकारी याच प्रमाणे 25000 पक्षा जास्त पगार घेत असलेले कर्मचारी या सर्वांचे माहिती पोर्टल वरती अपलोड केली जाईल.
योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या प्रकाशित करणं त्याला प्रसिद्धी देणे, याचप्रमाणे आधार लिंक नसलेल्या कर्ज खात्यांच्या याद्या प्रसिद्ध करणे त्याला प्रसिद्धी देणे, योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढणे त्याच प्रसिद्धी देणे इत्यादी काम या समितीच्या माध्यमातून केली जाणार आहेत.
शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करत असताना शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी जिल्ह्यामध्ये मेळाव्या आयोजित करणे कर्जमाफीच्या प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारी घेणं त्याचं निवारण करण आणि कर्जमाफी योजनेला जिल्हास्तरावरती प्रसिद्धी देणे अशा प्रकारच्या बाबी या समितीच्या माध्यमातून पार पाडल्या जाणार आहेत.
एकंदरीत शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल शासनाच्या माध्यमातून उचलण्यात आलेला आहे.
#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #शेतकरीकर्जमुक्तीयोजना2026