90% अनुदानावर ताडपत्री नवीन अर्ज आमंत्रित | zp scheme 2024

शेतक-यांसाठी ९० टक्के अनुदानावर प्लास्टिक ताडपत्री योजना

Zp scheme 2024


जिल्हा परिषदेच्या उपकर योजनेतून सर्वसाधारण शेतक-यांना ९० टक्के अनुदानावर प्लास्टिक ताडपत्री देण्यात येणार असून, पात्र व्यक्तींनी दि. ५ जानेवारीपूर्वी पंचायत समितीत गट विकास अधिका-यांकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



ही योजना सर्व संवर्गातील शेतक-यांसाठी खुली आहे. योजनेत ४५० जीएसएम व सहा बाय सहा मीटर लांबीची ताडपत्री ९० टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. अर्जदाराकडे अकोला जिल्ह्यात स्वत:च्या मालकीची जमीन असावी. अर्जासह चालू वर्षाचा स्वत:चा डिजीटल (क्यू आर कोड) असलेला तलाठी यांचा सातबारा जोडावा.

अर्जदाराने यापूर्वी लाभ घेतलेला नसावा. अर्जदार दिव्यांग असल्यास तसे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे. केवायसी झालेल्या बँकेच्या पासबुकाचे पहिल्या पान, आधारकार्ड यांच्या झेरॉक्स, तसेच कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषी) यांचे शिफारसपत्र अर्जाला जोडावे, असे आवाहन जिल्हा कृषीविकास अधिका-यांनी केले आहे.