देशात आयुषमान भारत डिजिटल मिशनचा प्रारंभ || PM to launch Ayushman Bharat Digital Mission

PM to launch Ayushman Bharat Digital Mission
 27 सप्टेंबर 2021 रोजी एनएचए आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा तिसरा वर्धापन दिन साजरा करत आहे , आणी याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयुषमान भारत डिजिटल मिशनचा( PM -DHM )  शुभारंभ करतील.

 Video असे बनवा आपले हेल्थ कार्ड


पीएम-डीएचएमचा ( Ayushman Bharat Digital Mission ) देशव्यापी प्रारंभ  होत आहे.  या कार्यक्रमाला  केंद्रीय आरोग्य मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.जन धन योजना आधार कार्ड आणि मोबाईल ( JAM ) आणि सरकारच्या इतर डिजिटल उपक्रमांद्वारे रचलेल्या  पायावर आधारितपीएम-डीएचएम व्यापक डेटामाहिती आणि पायाभूत सेवांच्या  तरतुदीद्वारे एक वेगवान ऑनलाइन मंच तयार करेल आणि आरोग्य-संबंधित वैयक्तिक माहितीची सुरक्षागोपनीयता आणि खासगीपणा  सुनिश्चित करताना खुल्याआंतर परिचालन मानकांवर आधारित डिजिटल प्रणालींचा योग्य वापर  करेल. 

हे डिजिटल  मिशन नागरिकांना त्यांच्या संमतीने नागरिकांच्या आरोग्य नोंदींमध्ये प्रवेश आणि देवाणघेवाण सक्षम करेल.

 

पीएम-डीएचएमच्या ( PM DHM  ) मुख्य घटकांमध्ये प्रत्येक नागरिकाचे आरोग्य ओळखपत्राचा ( HEALTH  ID ) समावेश आहे जे त्यांचे आरोग्य खाते म्हणून देखील काम करेल आणि त्याच्याशी वैयक्तिक आरोग्य नोंदी जोडल्या जाऊ शकतात. 

या मोबाईल ऍप्लिकेशनचं मदतीने पाहिल्या जाऊ शकतात. 

हेल्थकेअर प्रोफेशनल्स रजिस्ट्री (एचपीआर) आणि हेल्थकेअर फॅसिलिटीज रजिस्ट्रीज (एचएफआर) हे  आधुनिक आणि पारंपारिक औषध पद्धतीच्या सर्व आरोग्य सेवा प्रदात्यांचे केंद्र  म्हणून काम करतील. यामुळे डॉक्टर/रुग्णालये आणि आरोग्य सेवा प्रदात्यांसाठी व्यवसाय करणे सुलभ होईल.

मिशनचा एक भाग म्हणून तयार केलेले पीएम-डीएचएम सँडबॉक्स हे तंत्रज्ञान आणि उत्पादन चाचणीसाठी एक चौकट म्हणून काम करेल जे जे राष्ट्रीय डिजिटल आरोग्य परिसंस्थेचा भाग बनू इच्छिणाऱ्या खाजगी कंपन्यां आणि  संघटनांना मदत करेल. ते  आरोग्य माहिती प्रदाते किंवा आरोग्य माहिती वापरकर्ता  बनतील किंवा  पीएम-डीएचएमशी कार्यक्षमतेने जोडले जातील.

हे मिशन डिजिटल आरोग्य परिसंस्थेत आंतर परिचालन क्षमता निर्माण  करेलज्याप्रमाणे पेमेंटमध्ये क्रांतिकारी बदल करण्यात युनिफाइड पेमेंट इंटरफेसने (Unified Payments Interface UPI )  भूमिका बजावली होती.  आरोग्य सेवा सुविधांचा लाभ घेण्यापासून  नागरिक केवळ  एक क्लिक दूर असतील.


Digital health card