ड्राइविंग लायसन बाबत केंद्र शासनाची मोठी घोषणा, आता अस मिळणार driving license


ड्राइविंग लायसन बाबत केंद्र शासनाचा मोठा निर्णय 
नवीन कायद्यांतर्गत कोणतंही वाहन चालवण्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) म्हणजेच वाहन चालवण्याचा परवाना असणं गरजेचे आहे. 


मात्र हा परवाना काढणं खूप जिकिरीचे काम बनले आहे, यातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी,
केंद्र सरकारने (Central Government) ड्रायव्हिंग लायसन्सबाबत मोठी घोषणा केली आहे. 
या घोषनेनुसार आता कार उत्पादक कंपन्या (Car Manufacture Companies), ऑटोमोबाइल असोसिएशन (Automobile Association) आणि एनजीओ (NGO) यांना ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र (Driving Training Center) सुरू करण्याची परवानगी मिळणार आहे. 
या संस्थाच्या माध्यमातून त्यांच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या व टेस्ट उत्तीर्ण झालेल्याचालकांना ड्रायव्हिंग लायसेन्स (DL) देऊ शकणार आहेत.

त्यामुळे आता नागरिकांना आता या लायसन्ससाठी परिवहन विभागाच्या कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज पडणार नाही. 

 केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. 
या संस्थेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या परवान्यां सोबत प्रादेशिक परिवहन विभागाकडूनही पूर्वीप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन्स देणंही सुरू राहणार आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स आणि त्याच्याशी निगडित सेवा-सुविधांविषयी सातत्याने काहींना काही नवीन बदल केले जातात यात महाराष्ट्रात लर्निंग लायसन्स (Learning License)  नवीन नियम लागू केले आहेत. 
याकरता केवळ ऑनलाइन माध्यमातूनच अर्ज स्वीकृती होते.
आणि तुम्ही घरबसल्या टेस्ट देऊन लर्निंग लायसन ही काढू शकता,
पहा
पूर्ण प्रकिया video