shetkari Karjmafi 2026 कर्जमाफी बाबत शासनाचा मोठा निर्णय; कर्जखात्याच्या व्याजाबाबत बँकांना आदेश
शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय
लाभार्थ्यांच्या पात्र थकीत रकमेवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्याज आकारणी न करणेबाबत आदेश
Shetkari Karjmafi 2026
राज्यात शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 बाबत राज्य शासनाने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे.
आता शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभार्थ्यांच्या पात्र थकीत रकमेवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्याज आकारणी न करणेबाबत आदेश देण्यात आले आहेत.
शेतकरी कर्जमाफी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केल्यानंतर 31 मार्च 2026 ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंतच कर्जाचे व्याज शेतकऱ्यांना भरावे लागणार अशी परिस्थिती निर्माण झालेली होती व शेतकऱ्यांना एक मोठा आर्थिक भुर्दंड यामुळे बसणार होता.
यातच आता 1 जुलै 2026 रोजी शासनाने एक GR निर्गमित करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेतील कर्जमुक्ती व एकवेळ समजवता योजना अर्थात ओटीएस योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर एक एप्रिल 2026 ते योजनेचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना मिळेपर्यंत निकषानुसार योजनेअंतर्गत पात्र असलेल्या थकीत रकमेवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्याजाची आकारणी करू नये अशा प्रकारचे आदेश देण्यात आले आहेत.