शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रस्तावित; कागदपत्र सादर करण्याचे आवाहन.
Shetkari Karjmafi
शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण योजना प्रस्तावित; माहिती संकलनाचे काम सुरू, थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावी प्रशासनाचे आवाहन.
राज्यात राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडवून अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येत असून, त्याच अनुषंगाने प्रस्तावित शेतकरी कर्जमाफी योजनेसंदर्भात माहिती संकलनाचे काम सुरू आहे.
थकीत कर्जदार सभासदांची माहिती संकलित करुन विहीत नमुना प्रपत्र अ व ब मध्ये तयार करण्याचे काम संबंधित प्राथमिक कृषी पतपुरवठा सेवा सहकारी संस्था, तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा स्तरावर सुरु आहे.
राज्यातील विविध सेवा सहकारी संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे थकीत कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांनी अद्याप आपली आवश्यक कागदपत्रे बँकेकडे जमा केलेली नाहीत.
यामुळे या योजनेसाठी माहिती गोळा करण्यात विलंब होत आहे. शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, फार्मर आयडी व इतर आवश्यक माहिती सचिव किंवा वसुली अधिकाऱ्यांकडे द्यायवी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अनेक शेतकरी सभासदांनी अद्याप त्यांचे आधार कार्ड, बचत खाते क्रमांक आणि इतर अनुषंगीक माहिती संबंधित सेवा सहकारी संस्था किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत उपलब्ध करून दिलेली नाही. माहिती संकलनाच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होत आहेत.
सेवा सहकारी संस्थांचे थकीत कर्ज असलेल्या सभासदांनी संबंधित सहकारी संस्थेच्या सचिवाशी संपर्क करुन त्यांचे आधार कार्ड, फार्मर आयडी आणि इतर आवश्यक असलेली माहिती उपलब्ध करुन दिलेली नाही.
त्यामुळे सदर माहितीचे संकलन संस्था पातळीवर करता आले नाही. त्यामुळे सर्व शेतकरी सभासदांनी संबंधित संस्थेचे सचिव, किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेचे वसुली अधिकारी यांच्याशी त्वरीत संपर्क करुन आधारकार्ड आणि आवश्यक माहिती उपलब्ध करुन द्यावी
शेतकरी सभासदांनी तातडीने आपल्या गावातील सेवा सहकारी संस्थेचे सचिव किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील वसुली अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
तसेच आपले आधार कार्ड, बचत खाते क्रमांक व इतर आवश्यक कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावीत. कागदपत्रांची पूर्तता न केल्यास पुढील तांत्रिक अडचणी येऊ शकतात, त्यामुळे थकीत कर्जदार सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या कर्ज निवारण योजनेसाठी महत्त्वपूर्ण माहिती संकलनाचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सेवा सहकारी संस्था तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या शाखांकडील थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती विहित नमुना प्रपत्रांमध्ये संकलित केली जात आहे. यामध्ये आधार कार्ड, बचत खाते क्रमांक व इतर आवश्यक कागदपत्रांचा समावेश आहे.
आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यामुळे थकित कर्जदार शेतकऱ्यांचा कर्ज निवारण प्रक्रियेत सहभाग होणे शक्य होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कागदपत्रे सादर करून शेतकरी कर्ज निवारण योजनेत समावेश करुन घ्यावा, असे आवाहन उपनिबंधक यांनी केले आहे.